बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 04:11 PM2024-10-05T16:11:47+5:302024-10-05T16:13:01+5:30
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील ओरस हे त्यांचे मूळ गाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे सीताराम दळवी यांचे अखेरपर्यंत वास्तव्यास होते.
मुंबई - शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा संदीप दळवी हे मनसेमध्ये सरचिटणीस आहेत तर जावई आशिष शेलार हे भाजपा मुंबईचे अध्यक्ष आहेत.
बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सीताराम दळवींची अंधेरीत ओळख होती. अंधेरी पूर्व मतदारसंघात १९९५ साली सीताराम दळवी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्याआधी ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी सीताराम दळवी एक होते. शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता तसेच विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबध होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील ओरस हे त्यांचे मूळ गाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे सीताराम दळवी यांचे अखेरपर्यंत वास्तव्यास होते.
पितृतुल्य व्यक्तीमत्व गमावले, आशिष शेलारांनी व्यक्त केला शोक
शिवसेनेचे माजी आमदार, माजी नगरसेवक आणि आमचे सासरे सीताराम दळवी यांचे आज दु:खद निधन झाले. कुटुंब म्हणून प्रतिमाने लाडके वडिल तर ओमकारने प्रेमळ आजोबा गमावले आहेत. त्यामुळे शोकाकूल दळवी-शेलार परिवाराची आमची मोठी हानी झालीच आहे. तसेच सतत सामान्य माणसासाठी तळमळीने काम करणारे, संघर्षमय जीवन जगणारे पितृतुल्य व्यक्तीमत्वच त्यांचे कार्यकर्ते, मित्र परिवार या सगळ्यांनी गमावले आहे असं आशिष शेलारांनी म्हटलं.
पितृतुल्य व्यक्तीमत्व गमावले !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 5, 2024
शिवसेनेचे माजी आमदार, माजी नगरसेवक आणि आमचे सासरे सिताराम दळवी यांचे आज दु:खद निधन झाले.
कुटुंब म्हणून प्रतिमाने लाडके वडिल तर ओमकारने प्रेमळ आजोबा गमावले आहेत. त्यामुळे शोकाकूल दळवी-शेलार परिवाराची आमची मोठी हानी झालीच आहे. तसेच सतत सामान्य… pic.twitter.com/AeMUJfsb3i