बाळासाहेब ठाकरे स्मारक २७ टक्के पूर्ण, दुसरा टप्पा प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 11:53 AM2021-12-30T11:53:09+5:302021-12-30T11:53:30+5:30

सद्य:स्थितीत वास्तुविशारद, कंत्राटदार टाटा कंपनी व अन्य खर्च अशी एकूण ३५.९७ कोटी रक्कम खर्च झाली.

Balasaheb Thackeray memorial 27 percent complete | बाळासाहेब ठाकरे स्मारक २७ टक्के पूर्ण, दुसरा टप्पा प्रस्तावित

बाळासाहेब ठाकरे स्मारक २७ टक्के पूर्ण, दुसरा टप्पा प्रस्तावित

googlenewsNext

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या प्रथम टप्प्यातील कामाची भौतिक प्रगती २७ टक्के झाली आहे; तर टप्पा एकचे काम २३ मे २०२२ रोजी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. 

सद्य:स्थितीत वास्तुविशारद, कंत्राटदार टाटा कंपनी व अन्य खर्च अशी एकूण ३५.९७ कोटी रक्कम खर्च झाली. वास्तुविशारद आभा लांबा नरियन यांना ६.४७ कोटी रुपयांचे काम देण्यात आले असून त्यांना ३.२१ कोटी रुपये देण्यात आले. कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला १८०.९९ कोटी रुपयांचे काम देण्यात आले; त्या कंपनीस २८.९३ कोटी रुपये देण्यात आले आहे. अन्य खर्चात वेगवेगळ्या खात्यांची ना हरकत प्रमाणपत्रे, मुद्रांक शुल्क, परवानगी शुल्क यांवर ३.८२ कोटी खर्च करण्यात आले.

महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार आणि संग्रहालय
पहिला टप्पा २५० कोटी रुपयांचा आहे. यात एंट्रन्स ब्लॉक, आर्टिस्ट सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर, हेरिटेज कॉन्झर्वेशन, महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार, संग्रहालय आणि लँडस्केपिंगमध्ये संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे.

दुसरा टप्पा प्रस्तावित
स्मारकाचा दुसरा टप्पा १५० कोटींचा आहे. यात तंत्रज्ञान, लेसर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथन, कथाकथन, फिल्म, संग्रहालय कथनातील ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटकांचा समावेश आहे.

४०० कोटींची मान्यता
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक प्रस्तावित करताना १०० कोटी रकमेच्या अपेक्षित खर्चास नगरविकास विभागाच्या २० फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान झाली.  
१६ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे ४०० कोटी रकमेस सुधारित प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली.

Web Title: Balasaheb Thackeray memorial 27 percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.