हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 09:32 AM2018-11-17T09:32:15+5:302018-11-17T12:07:22+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत.
मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मृतिस्थळाला भेट देऊन सहकुटुंब बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे.
आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन ! pic.twitter.com/M94LcUFXOl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2018
शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम आपल्याला मार्गदर्शन करीत राहतील... pic.twitter.com/z60FSMU7fq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2018
#हिंदुहृदयसम्राट वंदनीय #शिवसेनाप्रमुख#बाळासाहेब_ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली ! pic.twitter.com/Ng1QQKFfH3
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) November 17, 2018
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन! #साहेबस्मृतीदिनpic.twitter.com/gPbA88NgZi
— Gajanan Kirtikar (@GajananKirtikar) November 17, 2018