Join us

#Videos : जयंती विशेष : नारायण राणेंपासून शरद पवारांपर्यंत बाळासाहेब ठाकरे आपल्या शैलीत घ्यायचे सर्वांचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 2:43 PM

बाळासाहेबांनी भाषण देत असताना कायम प्रत्येकाचा समाचार घेतला. मग ते नारायण राणे असोत की शरद पवार.

ठळक मुद्दे‘जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो’ या त्यांच्या पहिल्या वाक्यावर लोकांचे कान टवकारले जायचे आणि हात जोडले जायचे.त्यांच्या भाषणांना मोठ्या मोठ्या गाड्या भरून लोकं यायची. ते बोलु लागले की सर्वांचा आवाज बंद व्हायचा. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि शिवगर्जनेच्या घोषणा सुरु व्हायच्या. असंच आपल्या वक्तृत्त्वशैलीवर त्यांनी अनेक शिवसैनिक जमवले.

मुंबई : बाळ ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची आज ९१वी जयंती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देशभर सर्वच त्यांना त्यांच्या आक्रमक आणि कणखर भाषणशैलीसाठी ओळखतात. त्यांच्या भाषणांना मोठ्या मोठ्या गाड्या भरून लोकं यायची. ते बोलु लागले की सर्वांचा आवाज बंद व्हायचा. त्यांच्या ‘जय महाराष्ट्र’ची साद वाघाच्या गर्जनेसारखी भासायची. ते बोलु लागले की लोकं त्या मैदानात किंवा टीव्हीसमोर जमा व्हायची. रस्ते रिकामे व्हायचे आणि मुंबईकर त्यांनी तोंडातून काढलेला एक एक शब्द टिपायला तयार असायचे. ‘जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो’ या त्यांच्या पहिल्या वाक्यावर लोकांचे कान टवकारले जायचे आणि हात जोडले जाऊन तोंडून शिटी वाजायची. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि शिवगर्जनेच्या घोषणा सुरु व्हायच्या. आपल्या वक्तृत्त्वशैलीवर त्यांनी अनेक शिवसैनिक जमवले. आपल्या भाषणात ते मग कुणालाच सोडत नसत. मग ते खुद्द नारायण राणे असोत की शरद पवार किंवा मग मुस्लिम जनता अथवा परप्रांतिय लोंढे. कधी आक्रमक तर कधी विनोदी पध्दतीने बाळासाहेबांनी सर्वांचाच आपल्या खास शैलीत खरपुस समाचार घेतला. पाहुयात त्यापैकी ही काही गाजलेली भाषणे.

१) नारायण राणे अर्थात नागोबाचं पिल्लु

नारायण राणे साहेबांसाठी कायम जवळचे होते. मात्र त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यावर नक्कीच साहेबांचा पारा चढला असणार. या भाषणात त्यांनी नारायण राणेंबाबतचा हा किस्सा सांगितला आणि जमलेले पोट धरुन हसायला लागले. ऐका तुम्हीही.

 

२) शरद पवार राजकीय शत्रु पण वैयक्तिक मित्र

शरद पवारांशी बाळासाहेब एक चांगला वैयक्तिक मित्र म्हणून वागत. ते त्यांना राजकारणातला शत्रु म्हणून संबोधत मात्र आपल्यात राजकारणाबाबत वैचारिक भिन्नता आहे, बाकी आम्ही चांगले मित्र आहोत, असंही ते म्हणत. तरीही पहा ते शरद पवारांबाबत काय बोलताहेत.

 

३) मराठी माणसांचं एकही फाईव्ह स्टार हॉटेल आहे का ?

आहे त्यात समाधानी राहण्याच्या मराठी माणसाच्या वृत्तीवर बाळासाहेबांनी या भाषणात प्रहार केला. आपला जन्म चमचे मोजण्यात जाईल असंही ते म्हणाले. ऐका भाषण  

 

४) मुंबई तुम्हाला का घाबरते? - राजीव शुक्लांचा प्रश्न

वाघाला नाही घाबरणार तर कोणाला घाबरणार - साहेबांचं तडकाफडकी उत्तर

तुम्ही मुंबईचे हिटलर आहात असं म्हटलं जातं अशा पत्रकाराच्या प्रश्नावर फक्त मुंबई नाही मी तर महाराष्ट्राचा आहे आणि मला देशाचा व्हायला आवडेल. लोकं जर वाघाला घाबरली नाहीत तर वाघाचा काय उपयोग.

 

५) बच्चा हुआ उसमे उपरवालेंकी क्या कृपा. प्रयत्न केलेत तर यश नक्कीच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा आहे, पण आहे. 

मुंबईमध्ये स्वच्छता प्रस्थापित करणं केवळ अशक्य असे म्हणणाऱ्यांना उत्तर देताना बाळासाहेबांनी हे विधान केलं होतं. किमान आधी प्रयत्न तर सुरु करुया, कारण प्रयत्न सुरु ठेवले तर कधी ना कधी यश आहेच.  

 

६) पत्रकारांच्या लिहिण्यावर बंदी असता कामा नये.

पत्रकारांच्या आणि साहित्यिकांच्या लिहिण्यावर बंदी आणली गेली तर मग आमचं लिहणं मुश्किल होईल. प्रत्येक लेख न्यायाधीशांना दाखवून , बघा हो, काही गडबड तर होणार नाही ना असं म्हणून परवानगी घ्यावी लागेल आणि ते आम्हाला मान्य नाही.

 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबई