Join us

बाळासाहेबांनी शेंदूर फासलेल्या दगडाचा माज उतरवायचा होता; महेश सावंतांचा सरवणकरांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 09:02 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत विजयी झाले. अमित ठाकरे आणि विद्यमान आमदार सदा सरवणकरांचा त्यांनी पराभव केला. 

Maharashtra News: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी मनसेचे अमित ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांचा पराभव करत विजय मिळवला. तीन वेळा आमदार राहिलेल्या सदा सरवणकरांना पराभूत करत सावंत जायंट किलर ठरले. विधानसभेतील विजयानंतर महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांच्या हल्ला चढवला. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार महेश सावंत हे कोकणातील त्यांच्या मूळगावी गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सदा सरवणकर यांना लक्ष्य केले. 

"बाळासाहेबांनी शेंदूर फासलेल्या दगडाचा माज उतरवला"

आमदार महेश सावंत म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला, त्या ३० वर्ष राजकारणात असलेल्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला", असे म्हणत आमदार सावंतांनी सरवणकरांना टीकेचा बाण डागला. 

आमदार महेश सावंत हे त्यांच्या मातोंड या गावी घोडेमुखाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले. 

"गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला आहे. कोकणची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली, तर स्वीकारेनच, नाही दिली तरीही इथल्या शिवसैनिकांना ताकद देईन", असेही ते म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४सदा सरवणकरशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024