लोकल प्रवासाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 06:53 AM2020-11-02T06:53:44+5:302020-11-02T06:54:23+5:30
Mumbai Local : आजपासून २७७३ फेऱ्या सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर दररोज २०२० फेऱ्या सुरू असून त्यामध्ये सोमवारपासून ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे.
राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव रेल्वेला पाठवत माहिती मागविली होती. मात्र आम्ही राज्य सरकारला माहिती दिली असून त्यावर राज्य सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे सांगत रेल्वेने प्रवासाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून उत्तर आले नाही. त्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे सांगत रेल्वेने आपली जबाबदारी लोकल प्रवासाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात झटकली.
आजपासून २७७३ फेऱ्या सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर दररोज २०२० फेऱ्या सुरू असून त्यामध्ये सोमवारपासून ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. सध्या मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण १०२० फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये ५५२ फेऱ्यांची, तर पश्चिम रेल्वे मार्गावर १००० फेऱ्या धावत असून त्यात आणखी २०१ फेऱ्यांची भर पडेल.