मुंबई विमानतळ परिसरात बलूनला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:12+5:302021-04-28T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम)द्वारे अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. २१ एप्रिल ते १९ जून २०२१ या कालावधीसाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेझर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडिंग), विमानाच्या उड्डाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना घडल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद आहे.
...................