मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर, १८ डिसेंबरपासून १२ फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:03 AM2017-12-17T01:03:18+5:302017-12-17T01:05:02+5:30

मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर लोकल दाखल होणार आहे. १८ डिसेंबरपासून या लोकलच्या १२ फे-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यात येतील.

Bambardier in the coaster of Central Railway, from 18th December to 12th February | मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर, १८ डिसेंबरपासून १२ फे-या

मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर, १८ डिसेंबरपासून १२ फे-या

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर लोकल दाखल होणार आहे. १८ डिसेंबरपासून या लोकलच्या १२ फे-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यात येतील. मध्य रेल्वे मार्गावर भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या ‘मेधा’ लोकलही येणार होत्या. या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धाणार असून, त्या बदल्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील एक बम्बार्डियर मध्य रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्या. त्यापैकी ४० गाड्या मध्य रेल्वेवर आणि ३२ गाड्या पश्चिम रेल्वेवर धावणार होत्या, परंतु मध्य रेल्वेवर डीसी ते एसी असे विजेचे परिवर्तन करावे लागणार होते. त्यामुळे सर्व बम्बार्डियर पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या आणि त्या बदल्यात पश्चिम रेल्वेकडील सिमेन्स लोकल गाड्या मध्य रेल्वेला देण्यात आल्या होत्या, परंतु या प्रशस्त आणि हवेशी बम्बार्डियर गाड्यांना पश्चिम रेल्वेवर प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने, आता बम्बार्डियर मध्य रेल्वेलाही हव्या आहेत. मध्य रेल्वेकडील सिमेन्स गाड्यांपेक्षा बम्बार्डियर वेगाने धावतात, तसेच बम्बार्डियर गाड्या जास्त हवेशीर असून, गाडीतील आसनाची व्यवस्था उत्तम आहे.

Web Title: Bambardier in the coaster of Central Railway, from 18th December to 12th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.