‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आणा’

By Admin | Published: September 11, 2014 01:23 AM2014-09-11T01:23:18+5:302014-09-11T01:23:18+5:30

पर्यावरणाच्या संवर्धनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यावरच बंदी आणण्याची मागणी काँग्रेस सदस्याने स्थायी समितीच्या बैठकीत आज केली़

Ban on 'Ganesh idols of Plaster of Paris' | ‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आणा’

‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आणा’

googlenewsNext

मुंबई : कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींचे पुन्हा समुद्रातच विसर्जन केले जात आहे़ यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यावरच बंदी आणण्याची मागणी काँग्रेस सदस्याने स्थायी समितीच्या बैठकीत आज केली़
मनसेचे संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे याकडे लक्ष वेधले़ प्लास्टरच्या मूर्तींमधील रासायनिक वापरामुळे जलचरांवर परिणाम होत असतो़ त्यामुळे तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी २००७ मध्ये कृत्रिम तलावाची संकल्पना आणली़ त्यानुसार यंदाही मुंबईत २७ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यानुसार १२ हजारांहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन अशा तलावांमध्ये भाविकांनी केले़
मात्र, या तलावांमध्ये जमा झालेला प्लास्टरचा गाळ पुन्हा समुद्रातच सोडण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी निदर्शनास आणले़ यावर आपले मत मांडताना प्लास्टर गणेशमूर्ती तयार करण्यावरच बंदी आणण्याची मागणी काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांनी केली़ शाडू मूर्तीचा प्रसार करून प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Ban on 'Ganesh idols of Plaster of Paris'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.