नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:43 AM2018-03-14T06:43:51+5:302018-03-14T06:43:51+5:30

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या ‘लेटर आॅफ अंडस्टँडिंग’ (एलओयू) व लेटर आॅफ क्रेडिट (एलओसी) वर बंदी आणली आहे. नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकेने हे पाऊल उचलले आहे.

Ban on Loans after Nirv Modi scam | नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी

नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी

Next

मुंबई : रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या ‘लेटर आॅफ अंडस्टँडिंग’ (एलओयू) व लेटर आॅफ क्रेडिट (एलओसी) वर बंदी आणली आहे. नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकेने हे पाऊल उचलले आहे. वस्तूची आयात करण्यासाठी देशातील बँकेच्या विदेशातील खात्यातून कर्ज मिळविण्याची सुविधा एलओयू किंवा एलओसीमुळे मिळते. या कर्जाची जबाबदारी एलओयू देणा-या बँकेची असते. त्याचाच गैरफायदा घेत, नीरव मोदीने पीएनबीची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली. पीएनबीकडून १२१२ एलओयू नीरव मोदीला ७४ महिन्यांत देण्यात आले.
>पीएनबी घोटाळ्यात वाढले आणखी ९४२ कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यात आणखी ९४२ कोटी रुपयांची भर पडली असून, गीतांजली ज्वेल्सकडील रकमेत ही वाढ झाली आहे. यामुळे हा घोटाळा आता १४ हजार कोटी रुपयांच्या वर गेला आहे. पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळ्याबाबत पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात माहिती सादर केली.

Web Title: Ban on Loans after Nirv Modi scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.