Join us  

सायन उड्डाण पुलावरून वाहतुकीस 'या' वाहनांना बंदी; लवकरच पुलाचे पाडकाम होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 6:26 AM

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सायन रोड ओव्हर ब्रीजला असुरक्षित घोषित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा कणा अशी ओळख असलेल्या सायन रोड ओव्हर ब्रीजवरून आता अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हर ब्रीजवर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शुक्रवार, शनिवारच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला जाईल.

मध्य रेल्वे मार्गावरील सायन पूल पाडून नवीन बांधण्याबाबत सातत्याने हालचाली होत होत्या. मात्र, स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर जुना पूल पाडून नवी पूल बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले होते. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाची भेट घेत दहावी, बारावीच्या परीक्षा आणि इतर गोष्टी ध्यानात घेत पुलाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पुलाचे पाडकाम पुढे ढकलले जात होते. 

- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सायन रोड ओव्हर ब्रीजला असुरक्षित घोषित केले आहे.- सायन येथील रेल्वे पूल पाडण्याचे काम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते.- २८ मार्चपासून पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, पुलाच्या पाडकामाची तारीख पुढे ढकलली गेली.- मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या, सहाव्या लाइनच्या कामासह अत्यंत जुन्या झालेल्या सायन रेल्वे पुलाच्या जागी नवा पूल बांधला जाणार आहे.- मध्य रेल्वे आणि महापालिका यासाठी एकत्र काम करणार आहे.

- सायन रेल्वे पूल ब्रिटिशकालीन आहे.- १९१२ साली बांधण्यात आला आहे.- मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी हा पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे.- २४ महिन्यात नवीन पूल बांधून पूर्ण केला जाईल.- महापालिका आणि रेल्वे यासाठी एकत्रित खर्च करतील.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कारवाई करणे गरजेचेसुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हर ब्रीजवर अवजड वाहनांचा प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शुक्रवार, शनिवारच्या रात्रीपासून जड वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला जाईल. सायन रोड ओव्हर ब्रीज जुना झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कारवाई करणे गरजेचे झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना उंची मापक लावले जातील. उंची मापक ३.६० मीटरचे असतील.

कोण किती खर्च करणार? मध्य रेल्वे    २३ कोटीमहापालिका    २६ कोटी

- पूल पाडल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होतील.- दोन्ही बाजूकडील वाहनांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागेल.

टॅग्स :सायन कोळीवाडामुंबईमुंबई ट्रेन अपडेट