“प्रीपेड मीटरवर बंदी, इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे वीज शुल्कात सूट”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 06:18 IST2025-03-06T06:17:08+5:302025-03-06T06:18:56+5:30

हा बदल अमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ban on prepaid meters and discount on electricity charges due to electric meters and cm devendra fadnavis | “प्रीपेड मीटरवर बंदी, इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे वीज शुल्कात सूट”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“प्रीपेड मीटरवर बंदी, इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे वीज शुल्कात सूट”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता पूर्वीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना दिवसा वीजवापरामध्ये १० टक्के वीज शुल्कात सूट मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरात दिली.

आ. विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक मीटर फीडरवर बसवण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत ते ट्रान्सफार्मरवर बसवण्यात येतील. त्यानंतर घरगुती मीटर बसवण्यात येतील. हा बदल अमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 

Web Title: ban on prepaid meters and discount on electricity charges due to electric meters and cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.