मुंबई : राज्यात लम्पी स्कीनआजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरवणे बंद करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून सतर्कता म्हणून मुंबईत प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
हे आदेश १४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता १८६० चे कलम १८८ व प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.