सुरक्षित जलपर्यटनासाठी सेल्फी बंदी करा, नीलम गो-हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:37 AM2018-01-16T04:37:40+5:302018-01-16T04:38:13+5:30

सुरक्षित जलपर्यटनासाठी राज्यातील समुद्रकिनारे, खाडी परिसर, धरणे, तलाव अशा ठिकाणी छायाचित्र काढण्यावर बंदी घालण्यात यावी.

Ban on selfie for safe pickup, demand for Sapphire Gohen-Hua Chief Minister | सुरक्षित जलपर्यटनासाठी सेल्फी बंदी करा, नीलम गो-हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सुरक्षित जलपर्यटनासाठी सेल्फी बंदी करा, नीलम गो-हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

मुंबई : सुरक्षित जलपर्यटनासाठी राज्यातील समुद्रकिनारे, खाडी परिसर, धरणे, तलाव अशा ठिकाणी छायाचित्र काढण्यावर बंदी घालण्यात यावी. तसेच अशा जागा ‘नो सेल्फी झोन’ म्हणून जाहीर करण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शनिवारी डहाणू परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने काही विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर गो-हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून सुरक्षित जलपर्यटनासाठी उपाय योजण्याची मागणी केली. सेल्फी काढत असताना विद्यार्थ्यांचा तोल गेल्याने डहाणू येथे ही बोट उलटली असण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. बोटींमधील अपुरी सुरक्षा साधने, बेकायदा बोटींमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे. त्यातच सेल्फीमुळे होणाºया दुर्घटनांमध्येही वाढ होत आहे. राज्यातील समुद्रकिनारे, खाडी परिसर, धरणे, तलाव अशा ठिकाणी छायाचित्र काढण्यावर बंदी घालण्यात यावी. तसेच या सर्व ठिकाणी सेल्फीबंदीचे फलक लावण्यात यावेत. धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा कायदा बनविण्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे गोºहे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
डहाणू येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोषी व्यक्तींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाईकरावी, प्रत्येक बोटीत क्षमतेनुसार प्रवासी बसतात किंवा नाही त्याचबरोबर किना-यावरून ती बोट आल्या गेल्याच्या वेळेची नोंद ठेवण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, पर्यटन क्षेत्रामध्ये चालणाºया प्रत्येक बोटीला आवश्यक तो परवाना, योग्य ती सुरक्षा साधने उपलब्ध आहेत किंवा नाही; सदर बोट सुस्थितीत आहे किंवा नाही याची खातरजमा करणारी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Ban on selfie for safe pickup, demand for Sapphire Gohen-Hua Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.