Join us  

सुगंधी सुपारी, खर्रा यांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 5:45 AM

राज्यात आता गुटखाबंदीचा कायदा अधिक कठोर केला जाणार असून, सुगंधी सुपारी आणि तंबाखू व सुपारीच्या मिश्रणाला (ज्याला मावा वा खर्रा म्हटले जाते) गुटखाबंदीचे नियम लागू होतील.

मुंबई : राज्यात आता गुटखाबंदीचा कायदा अधिक कठोर केला जाणार असून, सुगंधी सुपारी आणि तंबाखू व सुपारीच्या मिश्रणाला (ज्याला मावा वा खर्रा म्हटले जाते) गुटखाबंदीचे नियम लागू होतील. गुटखाबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या ंविरोधात संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी, गुटखा तयार केला जात असून, त्यात घातक रसायने टाकली जातात. त्यात मेलेल्या पालींचा वापर केला जात असल्याकडे शिवसेना गटनेता अनिल परब यांनी सभागृहाचे लक्ष वेधले..