Join us

‘बँड स्टँडवर पायही ठेवणार नाही’

By admin | Published: January 10, 2016 1:41 AM

सेल्फीच्या नादाला लागलो आणि जीवलग मैत्रिणीला गमवावे लागले, अशी खंत मुश्तरीने दिली. यापुढे बॅण्डस्टँडवर पायही ठेवणार नाही किंवा सेल्फी काढणार नाही, असेही ती म्हणाली.

मुंबई : सेल्फीच्या नादाला लागलो आणि जीवलग मैत्रिणीला गमवावे लागले, अशी खंत मुश्तरीने दिली. यापुढे बॅण्डस्टँडवर पायही ठेवणार नाही किंवा सेल्फी काढणार नाही, असेही ती म्हणाली.गोवंडीच्या बैगनवाडी परिसरात आम्ही तिघी राहतो. तिघींच्याही पुढच्या महिन्यात परीक्षा असल्याने इतरांप्रमाणे थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही बॅण्डस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे ठरविले. समुद्राच्या लाटांतील मजामस्तीत सेल्फी काढायचे आम्ही ठरविले. अखेर शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॅण्डस्टँडच्या समुद्रकिनारी पोहोचलो. समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी आम्ही खाली उतरलो. १५ ते २० मिनिटे पाण्यात मजामस्ती केली. अंजुमच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढले. अशात काही कळण्याच्या आतच अंजुमचा पाय घसरला. पायाखाली पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात आले. अंजुमने धरलेल्या हातामुळे आम्ही दोघीही खाली ओढल्या गेलो. मी एक हात खडकाला धरला तर दुसरा हात अजुमच्या हातात घट्ट आवळला. पाण्याच्या प्रवाहात तरन्नुम डोळ्यांदेखत वाहत होती. मात्र मी काहीच करू शकले नाही. आम्ही बचावासाठी आवाज देत होतो. त्याचवेळी गर्दीतून एक जण पुढे आला. त्याने मला आणि अंजुमला बाहेर काढले आणि तरन्नुमच्या बचावासाठी आत उडी घेतली.तरन्नुमने भीतीने त्यांना घट्ट मिठी मारली होती. काही कळण्याच्या आतच दोघेही या प्रवाहात दिसेनासे झाले. दरम्यान, प्राण वाचलेल्या अंजुम हिच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)घटनाक्रम...08:30AMतिघींनी घर सोडले09:45AMबॅण्डस्टँडच्या समुद्रकिनारी पोहोचल्या10:20AMसेल्फीसाठी पाण्यात उतरल्या10:40AMपातळी वाढल्याने बुडू लागल्या10:45AMरमेश वळुंजची बचावासाठी धाव10:50AMपोलिसांना कॉल11:00AMबचावकार्य सुरू07:30PMबचाव मोहीम थांबवली08:00PMनातेवाइकांची शोधमोहीम सुरू अंजुमवर भाभामध्ये उपचार सुरू आहेत.मुलींची माहिती...तरन्नुम अन्सारी (१८), एसएनडीटी विद्यालय (वाणिज्य शाखा पदवी प्रथम वर्ष)अंंजुम खान (१७), मेहता कॉलेज (वाणिज्य शाखा पदवी प्रथम वर्ष)मुश्तरी खान (१८), (वाणिज्य शाखा पदवी प्रथम वर्ष)