मुंबई : मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी दरवर्षी आपापल्या गावासाठी निघतात. पण अपुºया वाहतुकीच्या सोयीमुळे त्यांना वेळेत आणि सुखकर प्रवास करणे नेहमीच कसरतीचे होते. म्हणूनच यावर्षीपासून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून मुंबई येथील परेल स्थानक ते बांदा येथे एस. टी. ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.यावर्षी ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता एस.टी. परेल आगारावरून सुटणार असून बांदा दशक्र ोशीतील नेतर्डे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, बांदा, शेर्ले, मडूरे, कास, निगुडे, इन्सुली वाफोली, भालावल, कोनशी, सरमळे, नांगरतास, असनिये, डेगवे, विलवडे, घारपी, ओटवणे, आरोसबाग, नेमळे या गावातील लोकांना या एसटीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली. या एस.टी.चे नियोजन रूपेश परब, विश्वनाथ बेटकर व निलेश मोरजकर हे करणार आहेत.
बांदा - सावंतवाडीला जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी विशेष एसटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:17 AM