Mumbai Crime : मुंबईमधून अत्याचाराची आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने १८ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. तरुणी चारचाकीत बसताच गुंगीचे औषध असलेले पाणी आरोपींनी पीडितेला प्यायला दिलं. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. सातत्याने मुंबईसारख्या शहरात अत्याचाराच्या घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये एक सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणीला गुंगीचं औषध देऊन दोघांनी सामूहिक अत्याचार केला. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. पाण्यात गुगींचे औषध टाकून आरोपींनी तरुणीला ते प्यायला दिलं होतं. त्यानंतर आरोपींनी संधीची फायदा घेत तरुणीला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
१८ वर्षांच्या तरुणीला दोन आरोपींनी घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. त्यानंतर आरोपींनी तिला गुगींचे औषध मिसळलेले पाणी प्यायला दिलं. त्यामुळे ते पाणी पिताच पीडित तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपींनी पीडितेला अज्ञातस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीला आरोपींनी या प्रकाराबाबत कुठेही काही सांगितलं तर तुला जीवे मारू, अशी धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपींनी पीडितेला तिच्या घराजवळ सोडून पळ काढला. त्यानंतर धक्क्यातून सावरत पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. त्यातील एक आरोपी फिरोज अब्दुल मोतीन खान याला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच सीएसएमटी परिसरात महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. सीएसएमटी स्थानकाबाहेर २२ सप्टेंबरच्या रात्री पीडित महिला होती. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी जबरदस्तीने पीडितेला सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे नेले. त्यानंतर आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.