वांद्रे - वर्सोवा सी लिंक येत्या चार वर्षांत पूर्ण - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:08 AM2021-01-13T05:08:46+5:302021-01-13T05:09:12+5:30

पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणार; रोजगाराच्या संधी देखील वाढणार 

Bandra - Versova Sea Link completed in next four years - CM | वांद्रे - वर्सोवा सी लिंक येत्या चार वर्षांत पूर्ण - मुख्यमंत्री

वांद्रे - वर्सोवा सी लिंक येत्या चार वर्षांत पूर्ण - मुख्यमंत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा आज मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आणि त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. वांद्रे वरळी सी लिंक २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्यावतीने आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत या दोन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. वांद्रे वर्सोवा हा सी लिंक हा ९.६ किमीचा आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना ठाकरे यांनी केली. वर्सोवा-विरार या ४२.७५ किमी लांबीच्या सागरी मार्गाच्या पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे. 

वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरण विषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असून मच्छिमारांच्या हालचालींना हानी पोहचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छिमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

अर्थव्यवस्थेला मिळणार उभारी
वर्सोवा –विरार सागरी सेतू मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असून रोजगार संधी वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सादरीकरण केले.  

Web Title: Bandra - Versova Sea Link completed in next four years - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.