मुंबई - वांद्रे पश्चिम येथील २४ रोड, बालगंधर्व रंग मंदिराजवळ ६०० मिमी व्यासाच्या पाली हिल जलाशयाच्या इनलेटवर गुरुवारी भूमिगत गळती (प्राइमफेसी मायनर लीकेज) आढळून आली. दरम्यान पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी सुरू झाले असून रात्री १०.१५ पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामाचा कालावधी खोदकामानंतर आणि पाईपलाईनचे किती नुकसान झाले याचे मूल्यांकन केल्यानंतर ठरवले जाणार होते.
दुरुस्तीच्या कामानंतर रात्री १०.०० ते १२.३० वाजेपर्यंत दांडा कोळीवाडा, चुईम गाव, खार पश्चिमेला पाणीपुरवठा आणि डॉ. आंबेडकर रोड आणि खार पश्चिमेला रात्री १२.०० ते २.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पालिकेकडून करण्यात येणार आहे. दरम्यान रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सहकार्य करावे अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे.