वांद्रे-वरळी सी-लिंकचा प्रवास महागणार!, १ एप्रिलपासून लागू होणार नवे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:20 AM2018-03-26T06:20:21+5:302018-03-26T06:20:21+5:30
वांद्रे-वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून टोलवाढ होणार आहे.
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून टोलवाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दर तीन वर्षांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवर टोलवाढ होत असते. त्यानुसार, ही टोलवाढ होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. यापूर्वी २०१५ मध्येही टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
टोल कधीपर्यंत?
वांदे्र-वरळी सी-लिंकवरील टोल वसुलीची मुदत २०५२ पर्यंत आहे. २००९ पासून टोल वसुलीला सुरुवात झाली. आत्तापर्यंत जवळपास ६२० कोटी टोल वसूल करण्यात आला आहे.
अशी आहे टोलवाढ
१कार आणि एसयूव्ही गाड्यांना या आधी ६० रुपये टोल होता, पण नव्या दरानुसार आता या वाहनांना ७० रुपये टोल द्यावा लागणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी (रिटर्न जर्नी) ९० रुपयांवरून थेट १०५ रुपये टोल भरावा लागेल.
२ लहान मालवाहू गाड्यांना (टेम्पो) आधी ९५ रुपये टोल होता, पण नव्या दरानुसार ११० रुपये टोल द्यावा लागू शकतो. रिटर्न जर्नीसाठी १४० रुपयांवरून १६५ रुपये इतका टोल भरावा लागेल.
३बस आणि ट्रक या वाहनांना १२५ रुपये टोल द्यावा लागत होता. आता नव्या दरानुसार, १४५ रुपये टोल द्यावा लागू शकतो, तर रिटर्न जर्नीसाठी १८५ रुपयांवरून २१५ रुपये इतका टोल भरावा लागेल.
४ पासधारकांनाही आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कार आणि एसयूव्ही पासधारकांना ३ हजारऐवजी आता ३ हजार ५०० रुपये भरावे लागतील.
५लहान मालवाहू गाड्यांच्या (टेम्पो) पासधारकांना ४ हजार ७५० ऐवजी आता ५हजार ५०० रुपये भरावे लागतील. बस आणि ट्रक गाड्यांच्या पासधारकांना ६ हजार २५० ऐवजी आता ७ हजार २५० रुपये भरावे लागतील.