नवी मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: December 21, 2023 07:48 PM2023-12-21T19:48:46+5:302023-12-21T19:49:06+5:30
बेकायदेशीररित्या भारतात येत ओळख लपवून नवी मुंबई परिसरात राहत होते.
मुंबई : नवी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहे. खलील मैनुददीन सैयद (३०), हशुमुल्ला हसन शेख (२२) अशी आरोपींची नावे असून दोघेही मजुरीचे काम करतात.
दहशतवाद विरोधी विभागाच्या विक्रोळी युनिटला नवी मुंबईच्या कामोठे भागात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, एटीएसने कामोठेच्या सेक्टर १४ येथील म्हात्रे हाऊसमधून दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी अंती ते बांगलादेशी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानुसार, कामोठे पोलिसांनी दोघांना अटक करत अधिक तपास करत आहे. बेकायदेशीररित्या भारतात येत ओळख लपवून नवी मुंबई परिसरात राहत होते.