Join us

"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानासाठी उघडली 100 मुलींची बँक खाती

By मनोहर कुंभेजकर | Published: May 28, 2023 3:13 PM

केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना लागू केली आहे.

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नऊ वर्षे पूर्ण झाल्यावर लहान मुलींच्या नावाने बँक खाते उघडण्याची अभिनव योजना बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या हस्ते आज मुंबईत सुरू करण्यात आली. केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना लागू केली आहे.

"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानांतर्गत आमदार सुनील राणे यांनी आज बोरिवलीत मधुराम बॅकवेट येथे आयोजित कार्यक्रमात इयत्ता पाचवी पर्यंतच्या १०० मुलींना बँक बचत खाते पासबुकचे वाटप केले.तसेच प्रत्येक खात्यात 1000 रुपये जमा करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील राणे म्हणाले की, आज मुलींसाठी उघडलेल्या बँक खात्यातील ही बचत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: विविध शासकीय योजनांतून जमा होणारी रक्कम त्यांच्या उच्च शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल. ग्रामीण व शहरी भागातील मुलींच्या शिक्षणासाठी देशभरातील शहीद जवानांच्या मुलींना संगणक/टॅब, सायकल, लॅपटॉपचे मोफत वाटप वेळोवेळी केले आहे.

टॅग्स :मुंबईनरेंद्र मोदी