Join us  

बँकेतल्या ठेवी विकासकामांसाठी

By admin | Published: April 02, 2017 12:08 AM

बँकांमध्ये दीर्घ मुदतीवर ठेवलेल्या ६१ हजार कोटींच्या ठेवींकडे वारंवार राजकीय पक्ष बोटे दाखवून टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे ही

मुंबई : बँकांमध्ये दीर्घ मुदतीवर ठेवलेल्या ६१ हजार कोटींच्या ठेवींकडे वारंवार राजकीय पक्ष बोटे दाखवून टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे ही रक्कम विकास कामांवर खर्च केली जाणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सभागृहात गुरुवारी दिले.मुंबईच्या विकास कामासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात करोडो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, यापैकी तीस टक्के निधीही वापरला जात नसल्याने विकासकामे रखडतात व तरतूद वाया जाते. हा निधी दीर्घ मुदतठेवीच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये गुंतवला जातो. गेल्या काही वर्षांत हा निधी ६१ हजार कोटींवर पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदतीच्या ठेवी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाही अर्थसंकल्पातून करवाढ केली जाते.याबाबत पालिका महासभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाला जाब विचारला. संबंधित ठेवी कोण-कोणत्या बँकांमध्ये आहेत. पालिकेला त्यातून किती व्याज मिळते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावर प्रशासनाने अर्थसंकल्पात विविध भांडवली कामांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी केल्या जातात. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १ वर्ष व कामांच्या स्वरूपानुसार १ वर्षापेक्षा अधिक कालावधीही लागतो. मात्र, प्रकल्प कामांच्या मंजुऱ्या व परवानगी मिळविण्यास विलंब होतो. परिणामी, निधी वापरण्यास अडथळा निर्माण होतो, असे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)