बँकेतल्या ठेवी विकास कामांसाठी
By admin | Published: April 1, 2017 06:45 AM2017-04-01T06:45:40+5:302017-04-01T06:45:40+5:30
बँकांमध्ये दीर्घ मुदतीवर ठेवलेल्या ६१ हजार कोटींच्या ठेवींकडे वारंवार राजकीय पक्ष बोटं दाखवून टीकास्त्र सोडत आहेत.
मुंबई : बँकांमध्ये दीर्घ मुदतीवर ठेवलेल्या ६१ हजार कोटींच्या ठेवींकडे वारंवार राजकीय पक्ष बोटं दाखवून टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे ही रक्कम विकास कामांवर खर्च केली जाणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सभागृहात गुरुवारी दिले.
मुंबईच्या विकास कामासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात करोडो रूपयांची तरतूद केली जाते. मात्र यापैकी तीस टक्के निधीही वापरला जात नसल्याने विकासकामे रखडतात व तरतूद वाया जाते. हा निधी दिर्घ मुदत ठेवीच्या स्वरुपात विविध बँकांमध्ये गुंतवला जातो. गेल्या काही वर्षात हा निधी ६१ हजार कोटींवर पोहचला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदतीच्या ठेवी
एवढ्या मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाही अर्थसंकल्पातून करवाढ केली जाते.
याबाबत पालिका महासभेत हरकतीच्या मुद्दाद्वारे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाला जाब विचारला. (प्रतिनिधी)
यासाठी केली जाते गुंतवणूक
हा निधी बिनव्याजी पडून राहू नये, यासाठी तो बँकात गुंतवला जातो. सध्या ६१ हजार कोटी ५१० कोटी रुपये विविध बँकामध्ये जमा आहेत. त्यातून सन २०१३-१४ मध्ये २९८१.६४ कोटी, २०१४- १५ मध्ये ३८८४.३९ तर २०१५- १६ मध्ये ४१२८.४२ कोटी व्याज मिळाले आहे.