बँक कर्मचाऱ्यांचा ३०, ३१ मे रोजी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:17 AM2018-05-25T01:17:06+5:302018-05-25T01:17:06+5:30

३० मे रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणाºया या संपात १० लाखांहून जास्त सभासद, बँक कर्मचारी, अधिकारी सहभागी होतील.

Bank employees on 30, 31 May | बँक कर्मचाऱ्यांचा ३०, ३१ मे रोजी संप

बँक कर्मचाऱ्यांचा ३०, ३१ मे रोजी संप

googlenewsNext

मुंबई : इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम्स बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम्सने संपाची घोषणा केली. ३० मे रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणाºया या संपात १० लाखांहून जास्त सभासद, बँक कर्मचारी, अधिकारी सहभागी होतील.
याआधी इंडियन्स बँक्स असोसिएशनने बँक कर्मचाºयांच्या केवळ दोन टक्के वेतन वाढीसाठीची तयारी दाखविली होती. त्यास कडाडून विरोध करत पगारात पुरेशी वाढ आणि इतर सेवाशर्तींत योग्य ते सुधार करण्याची मागणी केली होती. १ नोव्हेंबर २०१७पासून नवीन वेतनवाढ लागू होणे अपेक्षित होते. मात्र, वेतन करारास सात महिन्यांहून अधिक उशीर झाल्याने व इंडियन्स बँक्स असोसिएशनच्या उदासीन भूमिकेमुळे बँक कर्मचारी व अधिकाºयांना संपावर जावे लागत असण्याची माहिती फोरमचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. या संपात देशातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील जुन्या बँका, प्रादेशिक-ग्रामीण बँकांतील कर्मचारी व अधिकारी सहभागी होतील. संपादरम्यान सहकारी क्षेत्रातील बँका मात्र सुरू राहतील. बँक कर्मचाºयांच्या संपामुळे धनादेश वठणावळदेखील दोन दिवस बंद राहील. देशभरातील एटीएम सेवा पहिल्या दिवशी ठप्प पडून रोख सेवा कोलमडून पडेल, असा दावा तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

Web Title: Bank employees on 30, 31 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.