Join us

बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनिश्चित; तिसरी बैठक निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 2:34 AM

६ टक्के पगारवाढ देण्याचा बँक व्यवस्थापनाचा प्रस्ताव सोमवारी कर्मचारी युनियनने फेटाळला आहे. बँक कर्मचा-यांना दर पाच वर्षांनी पगारवाढ मिळते.

मुंबई : ६ टक्के पगारवाढ देण्याचा बँक व्यवस्थापनाचा प्रस्ताव सोमवारी कर्मचारी युनियनने फेटाळला आहे. बँक कर्मचा-यांना दर पाच वर्षांनी पगारवाढ मिळते. त्यानुसार, २ टक्के पगारवाढ देण्याचा प्रस्ताव इंडियन बँक्स असोसिएशनने दिला होता, पण कर्मचा-यांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियनने (यूएफबीयू) तो फेटाळला होता.यूएफबीयूचे महाराष्टÑ संयोजक देवीदास तुळजापुरकर म्हणाले की, कर्मचाºयांच्या दबावामुळेच आयबीए २ वरून ६ टक्के पगारवाढ देण्यास तयार आहे. मागील पगारवाढ १५ टक्के होती. आता यंदाही समाधानकारक पगारवाढीची मागणी आहे.

टॅग्स :बँक