मुंबई : देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीवर इंडियन बँक असोसिएशनसोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने बँक कर्मचारी व अधिकाºयांनी संपाची हाक दिली आहे. आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनसह ९ केंद्रीय संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी ८ व ९ मे रोजी देशातील विविध राज्यांत निदर्शने करून कर्मचारी व अधिकाºयांनी आपला रोषही व्यक्त केला.फोर्टच्या हॉर्निमल सर्कल येथील स्टेट बँक आॅफ इंडियासमोर शेकडो कर्मचारी व अधिकाºयांनी मंगळवारी निदर्शने करीत वेतन कराराची मागणी केली. संघटनेचे राज्य सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले, वेतन करारासाठी चर्चा करण्यासाठी बसलेल्या संघटनांसमोर केवळ २ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव सादर करून, आयबीएने कर्मचारी आणि अधिकाºयांची थट्टा केली आहे. या विरोधात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील.
वेतन करार रखडल्याने बँक कर्मचारी संपाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:25 AM