Join us

बँक कर्मचा:यांचा आज देशव्यापी संप

By admin | Published: November 12, 2014 2:52 AM

केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्दय़ावर बँकांनी उद्या (बुधवारी) एक दिवसाच्या देशव्यापी संपाचे हत्यार उगारले आहे.

 मुंबई : वेतनवाढ, पेन्शन, बँकांचे विलीनीकरण, आउटसोर्सिग यासह अनेक प्रलंबित मुद्दय़ांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्दय़ावर बँकांनी उद्या (बुधवारी) एक दिवसाच्या देशव्यापी संपाचे हत्यार उगारले आहे. या संपात सर्व सरकारी, खाजगी, परदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकांचे असे एकूण 1क् लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने बँकांचे कामकाज पूर्णपणो ठप्प होणार आहे. देशातील विविध बँकांच्या सुमारे एक लाख शाखा बंद राहणार आहेत.