Join us

बँक कर्मचा:यांचा उद्या देशव्यापी संप

By admin | Published: November 11, 2014 1:55 AM

येत्या 12 नोव्हेंबर रोजी 1क् लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे देशव्यापी प्रतिनिधित्व करणा:या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या

मुंबई : केंद्र सरकार 10 द्विपक्षीय कराराकडे उपेक्षने पाहात असल्याने बँकिंग क्षेत्रतील उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी येत्या 12 नोव्हेंबर रोजी 1क् लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे देशव्यापी प्रतिनिधित्व करणा:या युनायटेड 
फोरम ऑफ बँक युनियन्सच्या 
वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
वेतनवाढीच्या प्रश्नासह कामाचे तास नियमबद्ध करावेत. पाच दिवसांचा आठवडा निश्चित करावा. आऊटसोर्सिगला आळा घालण्यात यावा. नोकर भरती ताबडतोब मोठय़ा प्रमाणावर करावी, आदी मागण्याही युनियनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सर्व बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदान येथे संघटनेची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत दहाव्या द्विपक्ष कराराच्या वाटाघाटीची चौदावी फेरी निष्फळ ठरली. 
युनियनने लवचीक धोरण दाखवूनही असोसिएशनच्या धोरणात तसूभरही बदल झाला नसल्याने युनियनचा पारा अधिकच चढला असून, 12 नोव्हेंबर रोजी याबाबत संताप व्यक्त करण्यात येणार असल्याचे कामगार नेते विश्वास उटगी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)