Join us

बोगस मजूर प्रकरण: दरेकर यांना हायकोर्टाचा दोन आठवड्यांचा दिलासा; तूर्त अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:59 AM

वेळेअभावी दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी हायकोर्टात होऊ न शकल्याने पुढील आदेश येईपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले.

मुंबई : बोगस मजूरप्रकरणी भाजप नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दोन आठवड्यांचा अंतरिम दिलासा मुंबई हायकोर्टाने मंगळवारी कायम केला. वेळेअभावी दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी हायकोर्टात होऊ न शकल्याने पुढील आदेश येईपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले.सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने दरेकरांनी हायकोर्टात याचिका केली. तपास अधिकाऱ्याला पुरविलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे आरोप केले आहेत. अर्जदार ११ ते १५ डिसेंबर, २०१७ आणि १८ ते २२ डिसेंबर, २०१७ दरम्यान नागपूरलाच होते. बाकीचे महिने ते मुंबईतच मजूर म्हणून काम करत होते, असे दरेकर यांच्या याचिकेत म्हटले आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेचे संचालक होण्यासाठी दरेकर यांनी बनावट कागदपत्रे देत मजूर श्रेणीतून बँकेची निवडणूक लढविली. मजूर श्रेणीतून २०१७-२०२१ या कालावधीत ते बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी सरकार व नागरिकांची फसवणूक केली.

टॅग्स :प्रवीण दरेकर