मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 06:15 PM2018-06-28T18:15:07+5:302018-06-28T18:15:19+5:30

मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

bank officer arrested | मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या 

मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या 

Next

मुंबई - जोगेश्वरीतील मेघवाडी येथे इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून, १९ वर्षीय मोलकरणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ज्योती हरिश्चंद्र पाटेकर असे तिचे नाव आहे. दीड वर्षापूर्वी ती कोकणातून मुंबईत घरकामासाठी आली होती. जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, ज्योतीच्या आत्महत्येबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आणि इमारतीत घरकाम करणाऱ्या इतर महिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाअंती आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीमध्ये बिझनेस हेड असलेल्या नितीन सेवाराम खन्ना (४२) याला काल अटक केली. आज महानगर दंडाधिकारी न्यायालयात खन्नाला हजर केल्यानंतर २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

ज्योतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी मेघवाडी पोलिस स्टेशनबाहेर घरकाम करणाऱ्या महिलांनी घोषणाबाजी केली होती. याआधीही ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये एका मुलीची हत्या करून तिला इमारतीवरून खाली फेकण्यात आलं होतं. तेव्हा ते प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप या महिलांना केला आहे. मात्र यावेळी ज्योतीला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निश्चय या महिलांनी केला. मयत ज्योती हि बँक अधिकारी नितीन खन्ना यांच्या घरी गेल्या दीड वर्षापासून 24 तास मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र,खन्ना यांची पत्नी ज्योतीचा छळ करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून ज्योतीला तिचा पगारही दिला नव्हता. खन्ना यांच्या मुलीचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी चांदीचे शिक्के आणले होते. त्यातील काही शिक्के हरवल्याने खन्ना कुटुंबातील काही सदस्य तिला ओरडले होते. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर मेघवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०६ अन्वये नितीन खन्नाला अटक केली आहे.

 

Web Title: bank officer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.