Join us  

बँक घोटाळा : साडेबारा कोटींची चित्रे, दागिने, घड्याळे केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 8:42 AM

डीएचएफएल घोटाळाप्रकरणी कारवाई सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणून गाजत असलेल्या डीएचएफएल प्रकरणी सीबीआयकडून जप्तीची कारवाई सुरूच असून, गुरुवारी साडेबारा कोटी रुपये मूल्याची चित्रे, घड्याळे आणि दागिने सीबीआयने जप्त केली. 

युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांना डीएचएफएल कंपनी आणि त्याचे मालक वाधवान बंधूंनी तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणातील पैशांद्वारे त्यांनी अनेक मौल्यवान चित्रे, दागिने, हिरे, घड्याळे यांची खरेदी केल्याची माहिती आता पुढे येत आहे. गुरुवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पाच कोटी ५० लाख रुपये किमतीची दोन मौल्यवान चित्रे, पाच कोटी रुपये किमतीची दोन घड्याळे आणि दोन कोटीचे दागिने जप्त केले. अंडरवर्ल्डशी संबंधित अजय नावंदर याच्या मुंबई तसेच महाबळेश्वर येथील घरांवर ८ जुलै रोजी छापेमारी करत काही रोख रक्कम आणि सुमारे साडेपाच कोटी रुपये मूल्याची चित्रे, शिल्प सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. या प्रकरणी वाधवान बंधूंना सीबीआयने यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?हे कर्ज प्रकरण सन २०१० मधील आहे. २४ जुलै २०१० रोजी एकूण २९ बँकांच्या समूहाने कर्जाचे वितरण केले होते. मात्र, यातून १२ बँका बाहेर पडल्या. या प्रकरणात दिले गेलेले कर्ज फेडले जात नसून कर्जापोटी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याची गोष्ट २०१९ मध्ये उजेडात आल्यानंतर  कर्ज रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

 

टॅग्स :बँकगुन्हेगारीपोलिस