सप्टेंबरमध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात ७ दिवस बँकांना सुटी, RBIकडून यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 10:25 AM2021-08-29T10:25:19+5:302021-08-29T10:25:30+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे

Banks to be closed for 12 days in September; 7 days bank holiday in Maharashtra | सप्टेंबरमध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात ७ दिवस बँकांना सुटी, RBIकडून यादी जाहीर

सप्टेंबरमध्ये बँका १२ दिवस राहणार बंद; महाराष्ट्रात ७ दिवस बँकांना सुटी, RBIकडून यादी जाहीर

googlenewsNext

मुंबई : ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये अनेक सण असल्याने बँकांना बऱ्याच सुट्या मिळतात. बँका बंद असल्यास अनेक कामे खाेळंबतात. सप्टेंबरमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार असून, त्यादृष्टीने कामांचे नियाेजन केल्यास अडचण हाेणार नाही. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्यांचा देखील समावेश आहे. सप्टेंबरमध्ये एकूण ६ साप्ताहिक सुट्या राहणार आहेत. इतर सुट्या या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतात. त्यानुसार महाराष्ट्रातील बँका ७ दिवस बंद राहणार आहेत. 

या तारखांना  बँकांना सुटी

महाराष्ट्रात ५, १०, ११, १२, १९, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. १० सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस बँका बंद राहतील, तर २५ आणि २६ तारखांना चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सलग दाेन दिवस बँका बंद राहतील.

Web Title: Banks to be closed for 12 days in September; 7 days bank holiday in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.