पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 06:10 AM2019-01-03T06:10:58+5:302019-01-03T06:15:01+5:30

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १२ ते १४ जानेवारी असे सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँक व्यवहार बंद राहणार आहेत.

 Banks closed for three consecutive days next week | पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद

पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद

मुंबई : जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १२ ते १४ जानेवारी असे सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँक व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे दुस-या आठवड्याच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे व्यवहार आटोपण्याचे आवाहन बँक कर्मचारी संघटनेने केले आहे, जेणेकरून तिसºया आठवड्यात ग्राहकांना अधिक त्रास सहन करावा लागणार नाही.
१२ जानेवारीला दुसरा शनिवार, १३ जानेवारीला रविवार आणि १४ जानेवारीला मकरसंक्रांत आणि पोंगल सणांमुळे बँक कर्मचाºयांना सुट्टी असेल. परिणामी, रोख व्यवहारांसह धनादेश वठणावळही बंद असेल. एकंदरीतच रोख रकमेसाठी शनिवारी व रविवारी ग्राहक बँक एटीएमवर उड्या घेतील. त्यामुळे ऐन सणासुदीत रोख रकमेची चणचण जाणवू शकते. परिणामी, आॅनलाइन व्यवहारापासून दूर असलेल्या ग्राहकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन बँक कर्मचारी संघटनेने केले आहे.

Web Title:  Banks closed for three consecutive days next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक