मुंबई : आघाडी सरकारने २००९ मध्ये दिलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती मिळणे अवघड झाले आहे. केवळ १० जिल्हा बँकांनी माहिती दिली असून, तीसुद्धा अर्धवट आहे. राज्य सरकारने वारंवार पाठपुरावा करूनही २५ जिल्हा बँकांनी कोणाला व किती कर्जमाफी दिली, याची आकडेवारीच दिलेली नाही.राज्यातील १० जिल्हा बँकांमधून ३ लाख ६८ हजार १७ शेतकºयांना कर्जमाफी दिल्याचे सांगितले जात असले, तरी ५६ हजार २९८ शेतकºयांचीच यादी सहकार विभागाकडे आली आहे. उर्वरित ३ लाख ११ हजार ७१९ शेतकºयांची नावे आलेली नाहीत. या बँकांनी ६३६ कोटी ६४ लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती. त्यात बीड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, बुलडाणा, धुळे, जळगाव, जालना, मुंबई, नागपूर व वर्धा या बँकांचा समावेश आहे.बीड व यवतमाळ जिल्हा बँकांनी माहिती उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. या दोन बँकांनी अनुक्रमे १,०७,९१२ व ६८,३३९ शेतकºयांना कर्जमाफी दिल्याचे म्हटले आहे, पण त्यांची नावे व पत्ते बँकांनी दिलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी अर्बन को-आॅप. बँकेने सर्व १०६ शेतकºयांची नावे दिली आहेत. नागपूर व वर्धा जिल्हा बँकांनी शेतकºयांची नावानिशी यादी सीडीद्वारे दिली आहे.बुलडाणा बँकेने कर्जमाफी दिलेल्या शेतकºयांची नावे सॉफ्ट कॉपीत संकलित करण्याचे काम चालू असल्याची माहिती सहकार आयुक्तांना दिली. धुळे जिल्हा बँकेने ४८ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपये कर्जमाफी दिली, पण त्याची नोंद संगणकावर नसल्याने सॉफ्ट कॉपी नाही, असे सांगून हात वर केलेआहेत.>मुंबईमध्ये नऊ शेतकरीजळगाव जिल्हा बँकेने ८२ हजार शेतकºयांना १४५ कोटींच्या घरात कर्जमाफी दिली, पण त्यांची माहिती उपलब्ध नाही, असे कळविले. एवढी मोठी रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात गेली, हे कळायला मार्ग नाही. तीच स्थिती समर्थ सहकारी बँक, जालना (१,२८२ : शेतकरी/ रक्कम २ कोटी ३६ लाख २० हजार १३२), जालना बँक (१७३ : शेतकरी/रक्कम १४,१४,१६८), परतूर बँक (३३ : शेतकरी/रक्कम १२,०८,८३२), मंठा बँक (२०७ : शेतकरी/ रक्कम ३३,३०,४५७) यांची आहे. मुंबई बँकेनेही ९ शेतकºयांचे १ लाख ८० हजार रुपये कर्ज माफ केल्याचे उघड झाले आहे.>यंदा माहिती आॅनलाइनआधीच्या कर्जमाफीचाहा गोंधळ समोर दिसतअसला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आता कर्जमाफी कोणाला व किती मिळेल, याच्या याद्याच आॅनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आधीच्या कर्जमाफीची बॅँकांकडे माहिती नाही, २५ जिल्हा बँकांचे तोंडावर बोट
By अतुल कुलकर्णी | Published: October 25, 2017 5:46 AM