Join us

उद्या बँकांचा देशव्यापी बंद; १० लाख बँक कर्मचारी होणार संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 6:00 AM

१० लाख बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स करते.

मुंबई : पगारवाढ, सेवाशर्तीतील सुधार या मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी अशा दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, विदेशी बँका, ग्रामीण बँका अशा प्रकारे देशभरातील बँकांमधील सुमारे १० लाख बँक कर्मचारी संपात सहभागी होतील. तर, महाराष्ट्रात बँकेच्या १० हजार शाखांत काम करणारे ४० हजारांहून अधिक बँक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली या संपात एआयबीईए, एनसीबीई, आयबोक, एआयबीओए, बेफी, इन्बोक, इन्बेफ, एनओबीडब्ल्यू आणि नोबो अशा नऊ बँकिंग संघटना सहभागी होतील. १० लाख बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स करते. संपात बँकांतील सफाई कर्मचारी, साहाय्यक महाप्रबंधक, अधिकारी, कर्मचारी सहभागीहोतील.तत्पूर्वी ३० जानेवारी रोजी मुख्य कामगार आयुक्तांसोबत युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. बैठकीत तोडगा न निघाल्यास संप करण्यात येईल. या संपानंतरही तोडगा निघाला नाही, तर ११, १२ आणि१३ मार्च रोजी पुन्हा संप करण्यात येईल. तेव्हाही मागण्या मान्य झाल्या नाही, तर १ एप्रिल रोजी पुन्हा संप करण्यात येईल, असा इशारा युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने दिला आहे.संप कशासाठी?बँक कर्मचाºयांना नवीन वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होणे गरजेचे होते. मात्र २७ महिन्यांच्या वाटाघाटीनंतरही तोडगा नाही.२७ जानेवारीला मुख्य कामगार आयुक्तांच्या पुढाकाराने दिल्लीत वाटाघाटी झाल्या. मात्र बँकर्सनी आडमुठी भूमिका घेतली. बँकर्सचा युक्तिवाद आहे की बँका तोट्यात आहेत. त्यामुळे पगारवाढ देणे शक्य नाही.गेल्या पाच वर्षांत सरकारने राबविलेल्या योजनांमुळे बँकांवरील कामाचा बोजा वाढला. रिक्त झालेल्या जागाही भरल्या नाहीत. कामाचा बोजा आणखी वाढला. म्हणून पगारवाढीची मागणी योग्य आहे, असे युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने स्पष्ट केले.दहाव्या द्विपक्षीय करारात बँक कर्मचाºयांना १५ टक्के पगारवाढ मिळाली. अकराव्या द्विपक्षीय कराराच्या वाटाघाटी त्यापुढे सुरू होऊ शकतात. पण, बँकर्स १२.२५ टक्के पगारवाढ देऊ इच्छितात. म्हणून बँक कर्मचाºयांत संताप आहे.वस्तुत: बँका कार्यगत नफ्यात आहेत. पण थकीत कर्जापोटीकराव्या लागत असलेल्या तरतुदीमुळे बँका तोट्यात, असे युनायटेडफोरम आॅफ बँक युनियन्सचे म्हणणे आहे.अर्थव्यवस्थेचे ३६ हजार कोटींचे नुकसान!देशासह राज्यातील मिळून सुमारे १० लाख ४० हजारांहून अधिक बँक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. या संपामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने सांगितले.

टॅग्स :बँक