मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशनने संपाची हाक दिली आहे. शुक्रवार, ३१ जानेवारी आणि शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी बँक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत, तसेच रविवारी सुट्टी असल्यामुळे एकूण तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.इंडियन बँक असोसिएशनच्या मागण्या अद्याप मान्य करण्यात आलेल्या नाहीत. समान कामाचे समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन अशा मागण्यांचा यात समावेश आहे. मात्र, सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यास ग्राहकांची गैरसोय होणार आहे. एटीएममध्येही पैशांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी ८ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांनी सहभाग घेतला होता.
Bank Strike : सलग तीन दिवस बँका राहणार बंद, इंडियन बँक असोसिएशनने दिली संपाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:55 AM