Join us

बंदी घातलेल्या प्लॅस्टिक, थर्माकोलला सजावटीचा ‘रंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:14 AM

गुढीपाडव्याच्या दिवशी सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. परंतु, ज्यांच्या घरी आधीच प्लॅस्टिक पिशवी व थर्माकोल जमा असेल त्यांनी काय करावे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मुंबई - गुढीपाडव्याच्या दिवशी सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. परंतु, ज्यांच्या घरी आधीच प्लॅस्टिक पिशवी व थर्माकोल जमा असेल त्यांनी काय करावे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप - सेक्टर १मधील एकवीरा विद्यालयाने यावर तोडगा काढला आहे. शाळेचे कलाशिक्षक एन. बी. मांडलिक यांनी विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिकपासून शोभेच्या वस्तू तयार करून याचा घरातील सजावटीसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो; हे पटवून दिले आहे.प्लॅस्टिक चमचे व ग्लास यांच्यापासून कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. यात लॅम्पशेड, फुलदाणी, फुल, बटवा, पेनपॉट, पूजेचा करंडा, कार्टूनचा ग्लास, पेंग्विन, फुलांची टोपली, कानातले दागिने, शोपीस यांसारख्या जवळपास ५० कलाकृती विद्यार्थ्यांनी बनविल्या आहेत. यातील काही वस्तू घराची सजावट, शोकेस, टेबलावर ठेवण्यासाठी वापरता येऊ शकतात.प्रत्येक विद्यार्थ्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, तरच कचऱ्यासारख्या गंभीर विषयावर आळा घालता येईल. उपक्रमाचा प्रसार झाला, तर घरात असलेले प्लॅस्टिक, थर्माकोल जे कचºयात टाकता येत नाही व वापरावर बंदी आहे. या प्लॅस्टिकपासून कलाकृती निर्माण करता येऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांची कल्पकता वाढते. शिवाय घरात प्लॅस्टिक कचराही साठून राहणार नाही. हा उपक्रम शासनाने प्लॅस्टिक बंदी केली त्या दिवसापासून सुरू करण्यात आला आहे. रोज एक कलाकृती बनवून त्याचे छायाचित्र इतर शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविले जाते, अशी माहिती कलाशिक्षक मांडलिक यांनी दिली.

टॅग्स :मुंबईप्लॅस्टिक बंदी