नाईक महामंडळाचे तत्कालीन एमडी बनसोड यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 05:48 AM2019-08-03T05:48:09+5:302019-08-03T05:48:11+5:30

लोकमतने उघड केला होता महामंडळातील घोटाळा

Bansod, then MD of Nike Corporation arrested | नाईक महामंडळाचे तत्कालीन एमडी बनसोड यांना अटक

नाईक महामंडळाचे तत्कालीन एमडी बनसोड यांना अटक

Next

यदु जोशी 

मुंबई : वसंतराव नाईक भटक्या जाती-विमुक्त जमाती विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड यांना महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी लातूर पोलिसांनी यवतमाळ यथे ताब्यात घेऊन अटक केली. लातूरचे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) कायमगुडे यांनी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लोकमतने या घोटाळ्यांवर सर्वप्रथम प्रकाश टाकला होता.

बनसोड हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी केलल्या घोटाळ्यांबाबतची तक्रार त्यांच्यानंतर व्यवस्थापकीय संचालक झालेले परमेश्वर जकीकोरे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. तसेच, लातूरमध्येही बनसोड आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला दोन ते तीन कोटी रुपयांच्या घरात असलेले हे घोटाळे ५० कोटींच्या घरात असल्याचे
म्हटले जाते.
बनसोड यांच्याजागी जकीकोरे हे व्यवस्थापकीय संचालक झाल्यानंतर बनसोड यांना प्रादेशिक व्यवस्थापकपदी नेमण्यात आले. घोटाळ्यांप्रकरणी ते आजही निलंबितच आहेत. जकीकोरे यांची शासनाने नियुक्ती करूनही काही महिने बनसोड यांनी व्यवस्थापकीय संचालकपद सोडले नव्हते. तसेच त्या काळातही नियमबाह्य निर्णय घेतल्याची तक्रार जकीकोरे यांनी केली होती. बनसोड यांना युती सरकारमधील तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्यांनी वेळोवेळी अभय दिल्याचीही चर्चा होती.

अधिकारीही सामील
च्या घोटाळ्यांप्रकरणी लातूरमधील महामंडळाचे व्यवस्थापक रमेश ढाले, प्रेमसिंग राठोड आणि कंत्राटी कर्मचारी बाळू पवार यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
च्मुंबईतील मुख्यालयातून कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप बेकायदेशीरपणे करण्यात आले, लाभार्र्थींच्या नावे कर्ज दिल्याचे दाखविले पण ते काही खासगी फर्मकडे वळते करण्यात आले, असे अनेक प्रकार घडले. महामंडळाच्या मुख्यालयातील काही अधिकारीही त्यात सामील होते.
च्परमेश्वर जकीकोरे यांनी या घोटाळ्यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

Web Title: Bansod, then MD of Nike Corporation arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.