Join us

लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 2:08 AM

आठवडाभरावर आलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत.

मुंबई : आठवडाभरावर आलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत. चित्रशाळेतून ढोलताशांच्या गजरात बाप्पाच्या उंचच उंच मूर्तींचे आगमन होत आहे. याच लाडक्या बाप्पाच्या अलंकारांवरही शेवटचा हात फिरवला जात असून लवकरच बाप्पाच्या मूर्तीवरील हे अलंकार गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडताना दिसेल. गिरगावातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ सुवर्णकार नाना वेदक यांनी घडविलेला १५ किलोंचा बाप्पाचा मुकुट यंदा लक्षवेधी ठरणार आहे.नाना वेदक यांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासांठी एकूण ७०-८० किलोचे दागिने घडविले असून ते जवळपास ४० लाखांच्या घरात आहेत. शहर-उपनगरातील शिवडीचा राजा, अंधेरीचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, चारकोपचा राजा, विरारचा महाराजा, गिरगावचा राजा, खेतवाडीचे बाप्पा इ. मंडळांनी अलंकारांसाठी यंदा आॅर्डर्स दिल्याचे वेदक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर यंदा घाटकोपर येथील अल्ताफनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने १५ किलोच्या जवळपास १५ लाखांचे मुकुट घडविल्याचे नाना यांनी सांगितले. तसेच सर्वाधिक मागणी आशीर्वादाच्या हाताला आणि सोनपावलांना असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून दागिन्यांची जडणघडण करत असलेले नाना या प्रक्रियेविषयी सांगताना म्हणाले की, चांदीला सोन्याचे फॉर्मिंग करून हे अलंकार बनविले जातात. यात केवळ चांदी नव्हे तर सोन्याचाही समावेश असतो. या अलंकारांच्या जडणघडणीचे काम मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होते. लालबागचा राजा आणि गणेशगल्लीच्या बाप्पाचे प्रत्येकी जवळपास १७ किलोंच्या अलंकारांच्या नूतनीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.>जीएसटीचापरिणाम नाहीनोटाबंदी आणि जीएसटीनंतरचा पहिलाच गणेशोत्सव असूनही अलंकारांच्या बाजारपेठेवर त्याचा तितकासा परिणाम झालेला नाही. कारण गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या सेवेखातर वस्तू सेवा कर भरून अलंकार घडविल्याचे नाना यांनी सांगितले.>उंदीरमामा, गदा रवाना होणार हैदराबादलालालबागच्या राजाचा थाट पाहून हैदराबाद येथील एका गणेशोत्सव मंडळाने नानांकडून खास राजासारखी गदा आणि उंदीरमामा घडविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, उंदीरमामा आणि ५ किलो वजनाची जवळपास तीन लाख रुपयांची गदा तयार असून लवकरच हैदराबादला रवाना होणार आहे.>बाप्पाच्या अलंकारांचा थाटगदा ५ किलो ३ लाखमुकुट १५ किलो १५ लाखआशीर्वादाचा हात साडेतीन किलो दोन लाखतोडे दीड किलो सव्वा लाखदोन पाऊल दीड किलो सव्वा लाखसोंडपट्टा ८०० ग्रॅम ६० हजारछोटा आशीर्वादाचा हात ७०० ग्रॅम ५० हजारभिकबाळी १०० ग्रॅम १० हजार