बाप्पाला भावपूर्ण निरोप : शहर-उपनगरांत उसळला भक्तांचा महापूर, विसर्जन मिरवणूक २२ तासांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:58 AM2017-09-07T03:58:44+5:302017-09-07T03:59:33+5:30

मंगळवारी तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाने मुंबईकरांचा निरोप घेतला. वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला.

 Bappa's heartfelt message: In the city-suburbs, devotees celebrate the immense immersion campaign of 22 hours! | बाप्पाला भावपूर्ण निरोप : शहर-उपनगरांत उसळला भक्तांचा महापूर, विसर्जन मिरवणूक २२ तासांची!

बाप्पाला भावपूर्ण निरोप : शहर-उपनगरांत उसळला भक्तांचा महापूर, विसर्जन मिरवणूक २२ तासांची!

Next

मुंबई : मंगळवारी तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाने मुंबईकरांचा निरोप घेतला. वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला.
मंगळवारी सकाळपासून घरगुती आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमधील गणपती विसर्जनास सुरुवात झाली. मानाचा गणपती समजल्या जाणाºया गोदी कामगारांच्या ‘कॉटनचा राजा’ने मोठ्या दिमाखात लालबागमध्ये प्रवेश केला. त्याच्या दर्शनानंतर गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ आणि ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी लालबागमध्ये भक्तांचा महापूर लोटला होता. मुंबईतील सर्वच विसर्जन मिरवणुकांमध्ये सर्वांत दीर्घकाळ म्हणजेच सुमारे २२ तास लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक रंगली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लाखो भक्तांनी गिरगाव चौपाटीवर राजाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत निरोप दिला. चोख बंदोबस्तात पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकांत एका पोलिसाच्या दुर्दैवी मृत्यूचा अपवाद वगळता मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. डीजेला बगल देत बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-पथकांना पसंती दर्शवल्याचे दिसले.दरम्यान, गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव, दादर, जुहू अशा सर्वच चौपाट्यांवर पोलिसांचा खडा पहारा होता. पालिकेनेही विसर्जनासाठी खास उपाययोजना केल्याचे दिसले. वाहतूक पोलिसांच्या चोख नियोजनामुळे फारच कमी ठिकाणी कोंडी झाली. विसर्जन मिरवणुका आणि चौपाट्यांवरील गर्दीचा फायदा घेत बहुतेक चोरांनी हात साफ केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गर्दी झाली होती. - आणखी वृत्त/हॅलो
आवाज वाढला : विसर्जन मिरवणुकीत लाऊडस्पीकर लावण्यावरून बहुतेक ठिकाणी पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद झाल्याचे चित्र दिसले. काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी होती. याउलट काही ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी, एका हद्दीतून दुसºया हद्दीत गेल्यानंतर लाऊडस्पीकर बंद करण्यास सांगणाºया पोलिसांवर कार्यकर्त्यांनी आवाज चढवल्याने वाद झाला.
दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
मंगळवारी बाप्पाच्या विसर्जनसाठी रस्त्यांवर भाविकांची गर्दी झाली होती. याच दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास दादरमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेल्या ७५ वर्षीय सावित्रीबाई ग्यानबा खोपडे यांचा दुचाकीच्या धडकेत अपघात झाला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.
बंदोबस्तादरम्यान पोलिसाचा मृत्यू-
लालबागचा राजाच्या बंदोबस्तादरम्यान सोमवारी एका पोलिसाचा
मृत्यू झाला. सतीश पांडुरंग साबळे (५५) असे मृत पोलिसाचे नाव
असून ते नायगाव सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे पोलिसांवरील ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
लालबागचा राजा येथे सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ४ क्रमांकाच्या गाडीवर ते कर्तव्य बजावत होते. बंदोबस्तादरम्यान अचानक ते चक्कर येऊन कोसळले. अन्य सहकाºयांच्या मदतीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे पोलिसांवरील ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Web Title:  Bappa's heartfelt message: In the city-suburbs, devotees celebrate the immense immersion campaign of 22 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.