आरतीच्या गजरात होतेय बाप्पाचे विसर्जन

By Admin | Published: August 9, 2016 02:48 AM2016-08-09T02:48:41+5:302016-08-09T02:48:41+5:30

सध्या सर्वत्र ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ मंडळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेशभक्त तरुणाईच्या पसंतीस उतरणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही हिट ठरला आहे

Bappa's immersion occurs in Aarti's Gaza | आरतीच्या गजरात होतेय बाप्पाचे विसर्जन

आरतीच्या गजरात होतेय बाप्पाचे विसर्जन

googlenewsNext

स्नेहा मोरे, मुंबई
सध्या सर्वत्र ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ मंडळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेशभक्त तरुणाईच्या पसंतीस उतरणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही हिट ठरला आहे. त्यात हाती वीणा वाजवीत गोड हसणारा बाप्पा सगळ्यांना भावतो आहे. मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या आरतीच्या गजरात बाप्पाचे विसर्जन होते आहे.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेले गिरणगावातील हे सर्वांत जुने मंडळ आहे. १९२० साली मंडळांची स्थापना झाली. विविध रूपांमधील या बाप्पाला आतापर्यंत अनेक प्रख्यात मूर्तिकारांनी घडविले आहे. चिंचपोकळी परिसराने गणेशोत्सवाचे वेगळेपण टिकवून ठेवले आहे.


रक्तदान, आरोग्य
तपासणी शिबिर
मंडळातर्फे गेली अनेक वर्षे स्थानिकांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शिवाय, वैद्यकीय तपासणीनंतर मोफत औषध वाटपही करण्यात येते. तसेच, रक्तदान मोहीम दरवर्षी राबविण्यात येते.

बाप्पा ‘अ‍ॅप’वर
टेक्नोसॅव्ही होणाऱ्या विश्वाची चाहूल ओळखून मंडळाने गणेशभक्तांसाठी खास अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. शुभम हिरवे याने तयार केलेल्या या अ‍ॅपचे नाव ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ असे असून यात बाप्पाची छायाचित्रे, व्हिडीओ, गणेशदर्शन मार्ग, आरती, मंडळाची माहिती आणि उपक्रम असे सर्व संदर्भ आहेत.
बाप्पाची आरती होतेय रेकॉर्ड
गेल्या अनेक वर्षांपासून ज्या आरतीच्या गजरात बाप्पाचे विसर्जन होते, त्या ‘चिंतामणीचे आम्ही वेडे...’ या आरतीचे यंदा रेकॉर्डिंग होत आहे. शिवाय, गणेश चतुर्थीच्या दिवशी या आरतीचे अनावरण होईल. या आरतीचे गायन संजय नलावडे करत असून सर्व रेकॉर्डिंग आणि कामाची जबाबदारी मंडळाचा साहाय्यक सदस्य सर्वेश शिर्के सांभाळत आहे.
शतक महोत्सवाची चाहूल
पुढील तीन वर्षांत हे मंडळ शतक महोत्सव साजरा करत असल्याने त्याची विशेष तयारी मंडळ करीत आहे. शतक महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे.

Web Title: Bappa's immersion occurs in Aarti's Gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.