बापू ! आम्हाला माफ करा..., टेक्नोसॅव्ही तरुणाईला गांधींबाबत अल्पज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:08 AM2017-10-02T03:08:35+5:302017-10-02T03:08:56+5:30

अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे.

Bapu! We're sorry ..., techno-savvy young people have little knowledge about Gandhi | बापू ! आम्हाला माफ करा..., टेक्नोसॅव्ही तरुणाईला गांधींबाबत अल्पज्ञान

बापू ! आम्हाला माफ करा..., टेक्नोसॅव्ही तरुणाईला गांधींबाबत अल्पज्ञान

googlenewsNext

संकलन : अक्षय चोरगे, सागर नेवरेकर
मुंबई : अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने स्वच्छतेचा संदेशही दिला जाणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तीन पिढ्यांसमोर आदर्श म्हणून उभे ठाकलेले महात्मा मात्र आजच्या एकविसाव्या शतकातील टेक्नोसॅव्ही तरुणाईला पुरेसे माहीत नाहीत, अशीच काहीशी स्थिती आहे. तळहातावर मावणाºया मोबाइलवर २४ तास व्यस्त असणाºया या टेक्नोसॅव्ही तरुणाईला ‘लोकमत प्रतिनिधीं’नी महात्मा गांधींबद्दल अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारले. साहजिकच संबंधितांना गांधीजींबद्दल पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले. जन्मस्थानापासून जन्मदिनापर्यंतच्या प्रश्नांवर तरुणाईने दिलेल्या उत्तरांमुळे अपेक्षाभंग झाला असला तरी या ‘रिअ‍ॅलिटी चेक’द्वारे या तरुणाईचे ज्ञान तपासणे, अक्कल काढणे हा आमचा हेतू नाही आणि उद्देश तर मुळीच नाही. शिवाय कोणाच्याही भावना दुखावण्याचाही यामागे उद्देश नाही. हेतू एवढाच, की ज्या बापूंनी अवघ्या जगाला वेड लावले, जगाला अहिंसेची शिकवण दिली; असे बापू टेक्नोसॅव्ही तरुणाईला तळमळीने माहिती व्हावेत. यानिमित्ताने पुन्हा संजूबाबाच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ची आठवणही जागृत झाली...

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- गांधी जयंती
गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- महात्मा करमचंद गांधी
गांधीजींचे जन्मठिकाण?
- माहीत नाही
गांधीजी कोणत्या राज्यातील होते?
- माहीत नाही
रसिका सोनार,
जोशी-बेडेकर महाविद्यालय

गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- मोहनदास करमचंद गांधी
गांधीजींची जन्मतारीख काय?
- २ आॅक्टोबर, वर्ष माहीत नाही
गांधीजी कोणत्या राज्याचे आहेत?
- गुजरात
गांधीजींच्या आईचे नाव - मीराबाई
सिद्धेश पवार, जे.जे . स्कूल आॅफ आर्ट्स

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- उद्या २ आॅक्टोबर आहे. महात्मा गांधी जयंती
महात्मा गांधींचे संपूर्ण नाव?
- माहीत नाही
देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
- महात्मा गांधी
महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?
- माहीत नाही
महात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत?- गुजरात
वैभवी राक्षे,
सिद्धार्थ महाविद्यालय

देशाचे राष्टÑपिता कोणाला संबोधतो?
- महात्मा गांधी
महात्मा गांधींचे संपूर्ण नाव काय?
- मोहनदास करमचंद गांधी
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- पुतलीबाई
गांधीजींच्या पत्नीचे नाव काय?
- कस्तुरबा गांधी
गांधीजी कोणत्या राज्याचे होते? -गुजरात
प्रणया खोचरे,
साठ्ये महाविद्यालय

२ आॅक्टोबरला काय आहे?
- गांधी जयंती
गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
मोहनदास करमचंद गांधी
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- कमलाबेन
गांधीजींची जन्मतारीख काय?
- २ आॅक्टोबर १८६९
प्रदीप भुसारे
जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्स

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- गांधी जयंती
गांधीजींची जन्म तारीख काय?
- माहीत नाही
गांधीजींचा जन्म कोठे झाला?
- माहीत नाही
गांधीजींच्या पत्नीचे नाव काय?
- माहीत नाही
सरोज जाधव,
नवजीवन महाविद्यालय

गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- मोहनदास करमचंद गांधी
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- मीराबाई
गांधीजींची जन्मतारीख काय?
- २ आॅक्टोबर १९१२
गांधीजी कोणत्या राज्याचे होते?
- गुजरात
परितोष पाटील,
- जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्स

उद्या कशाची सट्टी आहे?
- गांधी जयंती
गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- मोहनदास करमचंद गांधी
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- माहीत नाही
गांधीजींची जन्मतारीख काय?
- माहीत नाही
गांधीजी कोणत्या राज्याचे होते?
- महाराष्टÑ
सारंग माटल,
सरस्वती विद्यामंदिर

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे
गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- माहीत नाही
गांधीजींचा जन्म कोठे झाला?
- माहीत नाही
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- माहीत नाही
कल्पेश रेवाळे,
सरस्वती विद्यामंदिर

उद्या कशाची सुट्टी आहे?
- २ आॅक्टोबर, महात्मा जयंती
गांधीजींचे नाव काय?
- मोहनदास करमचंद गांधी
आपण देशाचे राष्ट्रपिता कोणाला संबोधतो?
- महात्मा गांधी
महात्मा गांधी कोणत्या राज्याचे होते?
- गुजरात
पायल पुजारी,
के. सी. महाविद्यालय


गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- महात्मा करमचंद गांधी
गांधीजींची जन्मतारीख काय?
- २ आॅक्टोबर, वर्ष माहीत नाही
गांधीजींच्या आईचे नाव काय?
- कस्तुरबा
गांधीजींच्या पत्नीचे नाव काय?
- कस्तुरबा
गांधीजी कोणत्या राज्याचे होते?
- गुजरात
प्रियंका केरकर, सीएचएम

उद्या काय आहे?
- गांधी जयंती
गांधीजींचे संपूर्ण नाव काय?
- माहीत नाही.
गांधीजी कोणत्या राज्याचे होते?
- गुजरात
राष्टÑपिता कोणाला संबोधतो?
- माहीत नाही
गांधीजींच्या पत्नीचे नाव काय?
- माहीत नाही
अमेय रेवाळे,
- टी. पी. भाटिया, विज्ञान महाविद्यालय

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- महात्मा गांधी जयंती आहे.
देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
- महात्मा गांधी
महात्मा गांधींचे संपूर्ण नाव?
- मोहनदास करमचंद गांधी
महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?
आठवत नाही
महात्मा गांधी यांच्या आईचे नाव?
- नाही आठवत...
महात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत?
- गुजरात
निकिता दांडेकर,
मुंबई विद्यापीठ

उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?
- गांधी जयंती
आपण देशाचे राष्ट्रपिता कोणाला संबोधतो?
- महात्मा गांधी
महात्मा गांधींचे संपूर्ण नाव?
- माहीत नाही
महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?
- कस्तुरबा गांधी
महात्मा गांधी यांच्या आईचे नाव?
- नाही लक्षात...
महात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत? - गुजरात
प्रियंका जाधव,
साठ्ये महाविद्यालय

Web Title: Bapu! We're sorry ..., techno-savvy young people have little knowledge about Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.