संकलन : अक्षय चोरगे, सागर नेवरेकरमुंबई : अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने स्वच्छतेचा संदेशही दिला जाणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तीन पिढ्यांसमोर आदर्श म्हणून उभे ठाकलेले महात्मा मात्र आजच्या एकविसाव्या शतकातील टेक्नोसॅव्ही तरुणाईला पुरेसे माहीत नाहीत, अशीच काहीशी स्थिती आहे. तळहातावर मावणाºया मोबाइलवर २४ तास व्यस्त असणाºया या टेक्नोसॅव्ही तरुणाईला ‘लोकमत प्रतिनिधीं’नी महात्मा गांधींबद्दल अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारले. साहजिकच संबंधितांना गांधीजींबद्दल पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले. जन्मस्थानापासून जन्मदिनापर्यंतच्या प्रश्नांवर तरुणाईने दिलेल्या उत्तरांमुळे अपेक्षाभंग झाला असला तरी या ‘रिअॅलिटी चेक’द्वारे या तरुणाईचे ज्ञान तपासणे, अक्कल काढणे हा आमचा हेतू नाही आणि उद्देश तर मुळीच नाही. शिवाय कोणाच्याही भावना दुखावण्याचाही यामागे उद्देश नाही. हेतू एवढाच, की ज्या बापूंनी अवघ्या जगाला वेड लावले, जगाला अहिंसेची शिकवण दिली; असे बापू टेक्नोसॅव्ही तरुणाईला तळमळीने माहिती व्हावेत. यानिमित्ताने पुन्हा संजूबाबाच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ची आठवणही जागृत झाली...उद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- गांधी जयंतीगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- महात्मा करमचंद गांधीगांधीजींचे जन्मठिकाण?- माहीत नाहीगांधीजी कोणत्या राज्यातील होते?- माहीत नाहीरसिका सोनार,जोशी-बेडेकर महाविद्यालयगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- मोहनदास करमचंद गांधीगांधीजींची जन्मतारीख काय?- २ आॅक्टोबर, वर्ष माहीत नाहीगांधीजी कोणत्या राज्याचे आहेत?- गुजरातगांधीजींच्या आईचे नाव - मीराबाईसिद्धेश पवार, जे.जे . स्कूल आॅफ आर्ट्सउद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- उद्या २ आॅक्टोबर आहे. महात्मा गांधी जयंतीमहात्मा गांधींचे संपूर्ण नाव?- माहीत नाहीदेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?- महात्मा गांधीमहात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?- माहीत नाहीमहात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत?- गुजरातवैभवी राक्षे,सिद्धार्थ महाविद्यालयदेशाचे राष्टÑपिता कोणाला संबोधतो?- महात्मा गांधीमहात्मा गांधींचे संपूर्ण नाव काय?- मोहनदास करमचंद गांधीगांधीजींच्या आईचे नाव काय?- पुतलीबाईगांधीजींच्या पत्नीचे नाव काय?- कस्तुरबा गांधीगांधीजी कोणत्या राज्याचे होते? -गुजरातप्रणया खोचरे,साठ्ये महाविद्यालय२ आॅक्टोबरला काय आहे?- गांधी जयंतीगांधीजींचे संपूर्ण नाव काय?मोहनदास करमचंद गांधीगांधीजींच्या आईचे नाव काय?- कमलाबेनगांधीजींची जन्मतारीख काय?- २ आॅक्टोबर १८६९प्रदीप भुसारेजे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सउद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- गांधी जयंतीगांधीजींची जन्म तारीख काय?- माहीत नाहीगांधीजींचा जन्म कोठे झाला?- माहीत नाहीगांधीजींच्या पत्नीचे नाव काय?- माहीत नाहीसरोज जाधव,नवजीवन महाविद्यालयगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- मोहनदास करमचंद गांधीगांधीजींच्या आईचे नाव काय?- मीराबाईगांधीजींची जन्मतारीख काय?- २ आॅक्टोबर १९१२गांधीजी कोणत्या राज्याचे होते?- गुजरातपरितोष पाटील,- जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सउद्या कशाची सट्टी आहे?- गांधी जयंतीगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- मोहनदास करमचंद गांधीगांधीजींच्या आईचे नाव काय?- माहीत नाहीगांधीजींची जन्मतारीख काय?- माहीत नाहीगांधीजी कोणत्या राज्याचे होते?- महाराष्टÑसारंग माटल,सरस्वती विद्यामंदिरउद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळेगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- माहीत नाहीगांधीजींचा जन्म कोठे झाला?- माहीत नाहीगांधीजींच्या आईचे नाव काय?- माहीत नाहीकल्पेश रेवाळे,सरस्वती विद्यामंदिरउद्या कशाची सुट्टी आहे?- २ आॅक्टोबर, महात्मा जयंतीगांधीजींचे नाव काय?- मोहनदास करमचंद गांधीआपण देशाचे राष्ट्रपिता कोणाला संबोधतो?- महात्मा गांधीमहात्मा गांधी कोणत्या राज्याचे होते?- गुजरातपायल पुजारी,के. सी. महाविद्यालयगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- महात्मा करमचंद गांधीगांधीजींची जन्मतारीख काय?- २ आॅक्टोबर, वर्ष माहीत नाहीगांधीजींच्या आईचे नाव काय?- कस्तुरबागांधीजींच्या पत्नीचे नाव काय?- कस्तुरबागांधीजी कोणत्या राज्याचे होते?- गुजरातप्रियंका केरकर, सीएचएमउद्या काय आहे?- गांधी जयंतीगांधीजींचे संपूर्ण नाव काय?- माहीत नाही.गांधीजी कोणत्या राज्याचे होते?- गुजरातराष्टÑपिता कोणाला संबोधतो?- माहीत नाहीगांधीजींच्या पत्नीचे नाव काय?- माहीत नाहीअमेय रेवाळे,- टी. पी. भाटिया, विज्ञान महाविद्यालयउद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- महात्मा गांधी जयंती आहे.देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?- महात्मा गांधीमहात्मा गांधींचे संपूर्ण नाव?- मोहनदास करमचंद गांधीमहात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?आठवत नाहीमहात्मा गांधी यांच्या आईचे नाव?- नाही आठवत...महात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत?- गुजरातनिकिता दांडेकर,मुंबई विद्यापीठउद्या कशाबद्दल सुट्टी आहे?- गांधी जयंतीआपण देशाचे राष्ट्रपिता कोणाला संबोधतो?- महात्मा गांधीमहात्मा गांधींचे संपूर्ण नाव?- माहीत नाहीमहात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव?- कस्तुरबा गांधीमहात्मा गांधी यांच्या आईचे नाव?- नाही लक्षात...महात्मा गांधी कोणत्या राज्याचे आहेत? - गुजरातप्रियंका जाधव,साठ्ये महाविद्यालय
बापू ! आम्हाला माफ करा..., टेक्नोसॅव्ही तरुणाईला गांधींबाबत अल्पज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:08 AM