Join us

बार कौन्सिल आॅफ इंडिया निवडणुकीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:58 AM

मार्च महिन्यात २८ मार्च रोजी होणा-या बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या पंच वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया ५ फेब्रुवारीला सुरू झाली़

मुंबई : मार्च महिन्यात २८ मार्च रोजी होणा-या बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या पंच वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया ५ फेब्रुवारीला सुरू झाली़ आतापर्यंत १० वकिलांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेबु्रवारी असून २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील़महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगर-हवेली, दमण या चार राज्यांसाठी ही निवडणूक होणार आहे़ मतदानाद्वारे २५ सदस्यांची निवड होईल़ या निवडणुकीचे चार राज्यात एकूण १ लाख २५ हजार मतदार आहेत़ एका मतदाराला पाच मते देण्याचा अधिकार आहे़ सर्वाधिक मते व त्यापेक्षा कमी मते या क्रमाने मत मोजणी होते़ सर्वाधिक मते असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते़ मतदानासाठी कोणतेही पॅनल नसते़ प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज भरले जातात़ आतापर्यंत मुंबई, धुळे, सोलापूर व अन्य काही जिल्ह्यातून १० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत़ यात अ‍ॅड़ डॉ़ गुणरत्न सदावर्ते, अ‍ॅड़ विनोद अग्रवाल यांनी मुंबईतून अर्ज भरले.कायदा क्षेत्रात ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते़ विधि विद्यापीठे व महाविद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा वाढवणे, महाविद्यालय व विद्यापीठांना संलग्नता देणे, वकिलांच्या कल्याणासाठी योजना आखणे, वकिलांविरुद्ध तक्र्रारींचा निवडा करणे तसेच न्यायाधीश निवडीआधी इच्छुकांसंबंधी अहवाल सादर करणे यासह अन्य महत्त्वाची कामे या कौन्सिलचे सदस्य करतात़ त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरत असते.याआधीच्या सदस्य कार्यकारणीची मुदत २०१६ मध्ये संपली़ निवडणूक व मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती़ याआधी एका मतदाराला दहा मते देण्याचा अधिकार होता़ निवडणूक प्रक्रियाही किचकट होती, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता़ या याचिकेवर गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला़ मतदाराला पाच मते देण्याचा अधिकार व अन्य बदल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले़>कोणतेही पॅनल नाहीएका मतदाराला पाच मते देता येतात. सर्वाधिक मते व त्यापेक्षा कमी मते या क्रमाने मतमोजणी होते़ सर्वाधिक मते असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते़ मतदानासाठी कोणतेही पॅनल नसते़