बारमध्ये लवकरच MRP नुसार मिळणार दारु? फडणवीस सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 05:08 PM2018-03-14T17:08:08+5:302018-03-14T17:11:50+5:30

अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून दारू विकणाऱ्या बारमालकांना चांगला दणका बसणार आहे

Bar will soon get ammunition as per MRP? Fadnavis will take the decision of the government | बारमध्ये लवकरच MRP नुसार मिळणार दारु? फडणवीस सरकारचा निर्णय

बारमध्ये लवकरच MRP नुसार मिळणार दारु? फडणवीस सरकारचा निर्णय

googlenewsNext

मुंबई - लवकरच आता बारमध्येही एमआरपीप्रमाणे दारु मिळण्याची शक्याता आहे. त्यामुळं अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून दारू विकणाऱ्या बारमालकांना चांगला दणका बसणार आहे. पण मद्यपींची चांगलीच चंगळ होणार आहे.  उत्पादन शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा विचारही राज्य सरकार करीत आहे 

राज्यातील महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला सुरू केली असून सर्व बारना एफएल-2 परवाना जारी करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. त्यामुळं आता लवकरच बारमध्ये एमआरपीच्या किंमतीनुसार दारु मिळणार आहे. 
राज्य सरकारने बार मालकांना एफएल-२ हा परवाना दिल्यास बारमधून एमआरपीच्या दरात दारू मिळेल पण, ही दारू विकत घेतल्यानंतर त्यांना बारमध्ये बसता येणार नाही. ते हवे त्या ठिकाणी मद्यपान करू शकतात, असं महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.  

सरकारच्या या निर्णयाला काहींनी विरोध दर्शवला आहे.  एफएल-2 हा परवाना दिल्यास त्याचा परिणाम आपल्या धंद्यावर होईल, अशी भीती वाईन शॉपमालकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या बारमधील दारूवर पाच टक्के वॅट आकारला जातो. तर एफएल-2 परवाना दिल्यास हा व्हॅट रद्द होणार आहे. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल-3 हा परवाना दिला जातो. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने एक्साईज ड्युटीतून 15 हजार कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष ठरवलं होतं. जानेवारी अखरेपर्यंत 23 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

हा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  

Web Title: Bar will soon get ammunition as per MRP? Fadnavis will take the decision of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.