Baramati Lok Sabha Result 2024 ( Marathi News ): बारामती लोकसभा मतदारसंघाची देशात चर्चा झाली होती. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. आज लोकसभेची मतमोजणी सुरू आहे. बारामतीची लोढत चुरशीने झाली होती. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुळे या विजयाच्या जवळ पोहोचल्या आहे. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट काय?
"बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय, असा टोलाही राहित पवार यांनी लगावला आहे.
"बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन, असंही रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार १ लाखांच्या फरकाने पराभूत
मतमोजणीला सुरवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. अखेर सुप्रिया सुळे एक लाखांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. अजितदादांनी सुरुवातीपासून बारामतीमध्ये खूप प्रचार केला होता. भावनिक होऊन जाऊ नका , कोणाचं ऐकू नका, माझंच ऐका अशी वक्तव्ये केली होती. बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवाराना होता. परंतु आता आलेल्या निकालावरून सगळं उलटच चित्र झाल्याचे दिसून आले आहे. अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचे या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. बारामतीत सर्वत्र जल्लोषचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत, साहेबांचाय नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात आहे.
बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे दिल्लीपासून गल्लीचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाचे हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह ‘साहेब’ आणि ‘दादां’च्या राजकारणाचेच एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते. मतदारसंघात यंदा ६९.४८ टक्के मतदान झाले. हेच मतदान २०१९ मध्ये ७०.२४ टक्के झाले होते. त्यामुळे यंदा बारामतीच्या मतदानात ०.७६ टक्के घट झाली. भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामांच्या मुद्यासह पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले.