BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:10 PM2021-01-28T12:10:20+5:302021-01-28T12:22:24+5:30

Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

BARC Recruitment 2021: posts including nurses, drivers at Bhabha Atomic Energy Center | BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

Next

Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज ही मागविण्यात आले आहेत. 


भाभा अणुशक्ती केंद्राने नुकतेच पात्र उमेदवारांकडून विविध जागांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 63 जागा आहेत. या पदांसाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी अर्ज भरण्यासही सुरुवात केली आहे. २१ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 
मुंबईमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी 12 वी, पदवीधारक अर्ज करू शकणार आहेत. 

जागा पुढील प्रमाणे...
मेडिकल/ई (न्यूक्लिअर मेडिसीन) : 1 जागा 
मेडिकल/डी (न्यूक्लिअर मेडिसीन) : 2 जागा
टेक्निकल ऑफिसर : 1 जागा
नर्स : 19 जागा
अधिकारी : 6 जागा
सायन्टिफिक असिस्टंट/सी : 7 जागा
सायन्टिफिक असिस्टंट(पॅथॉलॉजी) : 2 जागा
सायन्टिफिक असिस्टंट (न्यूक्लिअर मेडिसीन) : 1 
फार्मासिस्ट : 1 जागा
ड्रायव्हर, पंप ऑपरेटर, फायरमॅन : 11 जागा. 
स्टायपेंडरी ट्रेनी एकूण 10 जागा. 

अधिकृत जाहिरातीसाठी इथे क्लिक करा...

अधिकृत वेबसाईटसाठी इथे क्लिक करा...

 

Railway Recruitment: परीक्षा नाही! 10, 12 वी पाससाठी रेल्वेत नोकरीची संधी; केवळ एक मैदानी चाचणी

रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेलवे (SECR) मध्ये काही पदांवर भरती काढण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत सूचनेनुसार 26 पदांवर भरतीसाठी स्पोर्ट कोट्यातून उमेदवार निवडले जाणार आहेत.


भरतीसाठी शैक्षणिक योग्यता...
गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच काही पदांसाठी दहावी पास होण्यासोबतच आयटीआय होणेही बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना तीन वर्षांचे ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. कोणत्याही विषयात पदवी मिळविलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. 
या भरतीसाठी 18 वर्ष ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार हा 5200-20200 रुपये प्रति महिना असणार आहे. 

 

लोकसभा सचिवालयात नोकरीची संधी; 12 वी ते एमबीए, 90000 पगार
Lok Sabha Secretariat Recruitment 2021: लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) आदी 9 पदांवर भरती करण्यात येणार आहे. 

Lok Sabha Consultant Recruitment: पदांची संख्या...
हेड कन्सल्टंट - 01
सोशल मीडिया मार्केटिंग -  01
सोशल मीडिया - 01
ग्राफिक डिझायनर - 01
सीनियर कंटेंट रायटर  - 01
ज्युनिअर कंटेंट रायटर - 01
सोशल मीडिया मार्केटिंग  - 03

शिक्षणाची अट...
लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे. 

नोकरी विषयक बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: BARC Recruitment 2021: posts including nurses, drivers at Bhabha Atomic Energy Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.