अनुसूचित जाती प्रवर्गाची बार्टीची फेलोशिप रखडली, विद्यार्थ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 04:40 PM2023-03-31T16:40:50+5:302023-03-31T16:41:14+5:30

राज्यातील विचारवंत फेलोशिपच्या मुद्यावर राज्यपालांची भेट घेणार आहेत.

Barti's Fellowship of Scheduled Caste category stopped, students' agitation continues at Azad Maidan | अनुसूचित जाती प्रवर्गाची बार्टीची फेलोशिप रखडली, विद्यार्थ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरुच

अनुसूचित जाती प्रवर्गाची बार्टीची फेलोशिप रखडली, विद्यार्थ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरुच

googlenewsNext


मुंबई: एकीकडे सरकार राज्यातील जनतेसाठी मोठ-मोठे निर्णय घेत असल्याचे सांगित आहे, पण दुसरीकडे 'बार्टी' ने पात्र ठवलेल्या अनुसूचित जातींमधील 861 संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. यात सरकारने लक्ष घालावे यासाठी सुमारे दीड महिना फेलोशिपसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. 

राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट चालवली आहे, ती संतापजनक आणि दयनीय असल्याची भूमिका राज्यातील विचारवंतांनी घेतली आहे. डॉ. रावसाहेब कसबे, अर्जुन डांगळे, दिवाकर शेजवळ, प्रा. प्रज्ञा पवार, डॉ. महेंद्र भवरे, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. सुनील अवचार, प्रा. एकनाथ जाधव , सतीश डोंगरे, प्रा. दामोदर मोरे, डॉ. विजय मोरे हे विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या मुद्यावर राज्यपालांची भेट घेणार आहेत.

कुणबी मराठा समाजासाठी असलेल्या 'सारथी' आणि ओबीसी समाजासाठी असलेल्या 'म्हाज्योति' यांनी त्यांच्याकडील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली आहे. पण, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांबाबतच सरकार हात आखडता का घेत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे.

Web Title: Barti's Fellowship of Scheduled Caste category stopped, students' agitation continues at Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.